Religious Conversion | ‘धर्म परिवर्तनाला राजकीय रंग देऊ नका’ – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सुरू असलेल्या धर्म परिवर्तनाच्या (Religious Conversion) मुद्यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर शब्दात टिपण्णी केली आहे. धर्मपरिवर्तन हा अतिशय गंभीर प्रकार असून याला राजकीय रंग देवू नये असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदीवले आहे. तसेच यासंबंधीच्या याचिकेवर निर्णय घेण्यास ऍटर्नी जनरल आर. वेंकटरमानी यांनी सुप्रीम कोर्टास मदत करावी असे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहेत. (Religious Conversion)

 

जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराबाबत ठोस कारवाई करण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने धर्म परिवर्तनावर चिंता व्यक्त केली. तसेच या प्रकारला राजकीय रंग देण्यात येवू नये असे निरिक्षण देखील यावेळी नोंदविण्यात आले. तसेच याप्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयास निर्णय घेण्यास मदत करावी अशी सुचना ऍटर्नी जनरल आर. वेंकटरमानी यांना सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आली. (Religious Conversion)

 

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील श्रध्दा वालकरचा निर्घूण खून तिचा बॉयफ्रेंड असलेल्या अफताब पूनावालाने केला होता. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते महरूलीच्या जंगलात फेकून देण्यात आले होते. त्यावरून राजकीय महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार राम कदम यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे आहे. असे म्हणत आंदोलन केले होते. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून श्रध्दा वालकरला न्याय मिळवा अशी मागणी त्यांनी केली होती.

त्यातच अगदी काही दिवसांपूर्वी मुंबईस्थित अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने गळफास घेत आत्महत्या केली होती.
त्यावर तिचा बॉयफ्रेंड शीजान खानला अटक करण्यात आली होती.
आणि हे प्रकरण देखील लव्ह जिहादशी संबंधित असल्याची बोलणी राजकीय पक्षांकडून होत होती.
त्यावर आता अशा गोष्टींचे राजकारण होवू नये असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

 

त्यावर धर्म परिवर्तन हा मुद्दा अतिशय गंभीर असून यावर राजकारण होऊ नये अशी टिपण्णी देखील
माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

 

Web Title :- Religious Conversion | religious conversion is serious issue given political colour not right supreme court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…