योगेश्वरी वधू-वर सूचक मंडळाचे कार्य उल्लेखनीय – कमलाकर चौसाळकर

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – आजच्या काळात विवाह संस्था उल्लेखनीय कार्य करीत आहेत. यामुळेच अनेकांचा दृष्टीकोन बदलला आहे यातुनच  विवाहासारखी समस्या लगेच सुटते ही बाब पालकांनी लक्षात घेवून या करिता पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यो.शि. संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर यांनी व्यक्त केले. योगेश्‍वरी ब्राह्मण वधु-वर सुचक मंडळाच्या दशकपुर्ती पुस्तक प्रकाशन, स्नेह मिलन कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष संजय लोणीकर, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता संजय देशपांडे, योगेश्वरी देवल कमेटीचे संचालक उल्हास पांडे, डॉ. दिलीप खेडगीकर, उत्तमराव कामखेडकर, वधु-वर सुचक मंडळाचे पदाधिकारी प्रभाकर सेलमोकर, बाबुराव बाभुळगावकर उपस्थित होते.

उल्हास पांडे म्हणाले की, विवाहाची समस्या ब्राह्मण समाजातच असून शिक्षण घेतलेल्या तरूणांनी पारंपारीक बंधनात फार न राहता यावर मार्ग काढला तरच या समस्याची लवकर सोडवणूक होवू शकते कामखेडकर  म्हणाले की, वधु-वर सुचक पुस्तिका म्हणजे पालकांसाठी आपल्या मुला-मुलींचे विवाह जमविण्याचा सोपा मार्ग असून पुस्तिकांमध्ये नोंद करीत असताना खर्‍या पद्धतीची माहिती देवून विवाह जमविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

पुढील काळात सल्लागार केंद्र विकसित व्हावेत या वेळी डॉ. खेडगीकर,अशोक पोतदार, संजय लोणीकर,संजय देशपांडे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक, संचालन श्रीपाद चिक्षे यांनी केले उपस्थितांचे आभार संचालिका कल्याणी कुलकर्णी यांनी मानले. संस्थेची भूमिका बाबुराव बाभुळगावकर यांनी विषद केली  मंडळाचे संचालक  अशोकराव टाकळकर, अरविंद पसारकर, राहूल देशपांडे, मुकूंद घाटे, स्मिता भातलवंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले  कार्यक्रमास अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.