‘या’ कारणास्तव रिझर्व्ह बँकेकडून ८.४६ टन सोने खरेदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ८.४६ टन सोन्याची खरेदी केली. गेल्या नऊ वर्षांनंतर आरबीआयने ही सोने खरेदी केली आहे. या सोनेखरेदीमुळे रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील सोन्याचा साठा ५६६.२३ टनांवर जाऊन पोहोचला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २०० टन सोने खरेदी केले होते. या सोने खरेदीमुळे रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील सोन्याचा साठा ३० जून २०१८ पर्यंत ५६६.२३ टनांवर जाऊन पोहोचला आहे.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’955514dc-b00b-11e8-86e8-bde4118ebf66′]

सोने खरेदीची कारणं

अॅक्सिस बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ सौगत भट्टाचार्य यांच्या मते अॅसेटमध्ये विविधता यावी यासाठीही सोने खरेदी केली असण्याची शक्यता आहे.

आर्थिक विषयाच्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याजदरांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेतर्फे करण्यात आलेल्या सोने खरेदीमुळे देशातील विदेशी चलनाच्या गंगाजळीला बळ मिळणार आहे.

या खरेदीच्या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत सोन्याच्या मागणीत वाढ होऊन त्याचा परिणाम या धातूच्या भाववाढीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हवाई दलाचे मिग विमान कोसळले

सुवर्ण यश मिळवून देणाऱ्या तेजिंदरच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच नाही