RBI चा खुलासा ! ATM च्या ‘फेल’ व्यवहाराला ‘फ्री’ मानता येणार ‘नाही’, बँकांकडून ग्राहकांची ‘लूट’ थांबणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्री एटीएम ट्रांजेक्शनवर भारतीय रिजर्व बँक आरबीआयने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. आरबीआयकडून सांगण्यात आले आहे की, एटीएमचे फेल होणारे ट्रांजेक्शन आणि एटीएममधून रक्कम काढताना रक्कम न निघणे असे ट्रांजेक्शनला ग्राहकांना दर महिन्याला मिळणाऱ्या फ्री ट्रांजेक्शनमध्ये मोजण्यात येऊ नये. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकाकडून ग्राहकांची होणारी लूट थांबणार आहे.

आरबीआयने याबाबतची सूचना बँकांना दिली आहे. यात आरबीआयकडून सांगण्यात आले की एटीएममधील रक्कम न निघणे, चुकीच्या पिन किंवा तांत्रिक कारणाने फेल होणाऱ्या ट्रांजेक्शनला फ्री एटीएम ट्रांजेक्शनमध्ये मोजण्यात येते. परंतू या ट्रांजेक्शनला वैध एटीएम ट्रांजेक्शन मानले जात नाही आणि यावर कोणातेही शुल्क वसूल केली जाणार नाही.

महिन्याला ५ ट्रांजेक्शन फ्री –  

एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना अधिकतर महिन्याला ५ ट्रांजेक्शन फ्री असतात आणि त्यापेक्षा अधिक ट्रांजेक्शन महिन्याला झाल्यास त्यावर अतिरिक्त शुल्क आकरण्यात येते. तसेच ट्रांजेक्शन फेल झाल्यास ते देखील ५ ट्रांजेक्शनमध्ये मोजण्यात येते, यामुळे ग्राहकांना पैसे न काढता देखील ट्रांजेक्शन वाया जाते. याशिवाय आरबीआयने स्पष्ट केले की, ज्या बँकेचे कार्ड असेल, त्याच बँकेच्या एटीएम मध्ये बॅलेन्स चेक करणे, चेक बुक रिक्वेस्ट, टॅक्स पेमेंट, फंड ट्रांसफर सारखे नाॅन कॅश विड्राल ट्रांजेक्शन देखील फ्री एटीएम ट्रांजेक्शनचा हिस्सा नसेल.

‘फ्री’ एटीएम ट्रांजेक्शनचे नियम –

१. ज्या बँकेचे एटीएम कार्ड आहे त्या बँकेच्या एटीएममध्ये 5 ट्रांजेक्शन फ्री मिळतील, इतर बँकांच्या एटीएममधून महिन्याला ३ किंवा ५ ट्रांजेक्शन फ्री मिळेल.
२. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकत्ता सारख्या मेट्रो शहरात ३ ट्रांजेक्शन फ्री मिळतील. 
३. फ्री ट्रांजेक्शनची सुविधा छोट्या बचत खात्यावर लागू नाहीत. 
४. फ्री लिमिट संपल्यानंतर ट्रांजेक्शन शुल्क २० रुपये आहे. 
५. बँक ग्राहकांना अधिक ट्रांजेक्शन देखील देऊ शकते. 

आरोग्यविषयक वृत्त –