Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती पडली पुन्हा एकदा प्रेमात; ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

पोलीसनामा ऑनलाइन : Rhea Chakraborty  | अभिनेत्री रिया चक्रवर्ती बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया आणि तिच्या कुटुंबीयांनादेखील खूप त्रास झाला होता. 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील राहत्या घरीच सुशांतने आत्महत्या केली होती, तर आता तब्बल दीड वर्षानंतर पुन्हा एकदा रिया प्रेमात पडल्याचे समोर आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रिया चक्रवर्ती बंटी सजदेहला डेट करत आहे. बंटी सजदेहल हा फॅशन डिझायनर सीमा सजदेहल यांचा भाऊ आहे. एवढेच नाही तर मनोरंजन क्रीडा विश्वातील नावाजलेल्या मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक फर्मचा तो मालकदेखील आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया अडचणीत होती. त्यावेळेला बंटीने तिला आधार दिल्याचे सांगितले जात आहे.

रिया आणि बंटीच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “हे दोघेही एकत्र राहून आनंदी असणे ही चांगली
गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत तिच्या कठीण प्रसंगात बंटी तिच्या मागे खंबीरपणे उभा होता.
तिच्या वाईट काळात त्याने तिची साथ सोडली नाही”. याआधी बंटीचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा
सोबत जोडले गेले होते. बंटी व सोनाक्षी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चादेखील सुरू होत्या.

Web Title :- Rhea Chakraborty | rhea chakraborty dating bunty sajdeh after sushant singh rajput death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | ‘देशातील सर्व शक्ती एकवटल्याने गुजरातमध्ये BJP आल्याचे नवल नाही; दिल्ली, हिमाचलमध्ये भाजप हरला’ – शरद पवार

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना