Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बँकेत नोकरी (Bank Job) लावण्याच्या बहाण्याने तरुणाकडून 4 लाख 59 हजार रुपये घेऊन नोकरी न लावता आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Crime) ऑक्टोबर 2020 ते मार्च 2022 या कालावधीत ताडीवाला रस्ता (Tadiwala road) परिसरात घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत राहुल संजय गायकवाड Rahul Sanjay Gaikwad (वय 27, रा. ताडीवाला रोड, पुणे) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रॉबिन राजन Robin Rajan (रा. देहू रोड बँक शेजारी), सुदेश राघवन (Sudesh Raghavan) यांच्यावर आयपीसी 406, 420, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची सप्टेंबर 2020 मध्ये ओळख झाली.
आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये
क्लार्क (Clark) पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
त्यासाठी दोघांनी तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेऊन 4 लाख 59 हजार रुपये घेतले.
आरोपींनी पैसे घेऊन नोकरी लावली नसल्याने फिर्यादी यांनी पैसे मागितले.
त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 5 lakh fraud of young man on the pretext of job in SBI Bank;
Incident in Tadiwala Road area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा