फोटोग्राफरने रिया चक्रवर्तीला विचारले, कैसे हो मॅम ? म्हणाली – ‘आता ठीक होतेय’

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला बराच काळ खटल्याचा आणि कायदेशीर तपासणीचा सामना करावा लागला. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूशी संबंधित रियाचा संबंध अद्याप देशातील मोठ्या तपास यंत्रणांना सापडलेला नाही. ड्रग्ज प्रकरणात दीर्घ कारावासाची शिक्षा भोगलेली रिया आता हळूहळू पुन्हा रुळावर आली आहे.

रिया सध्या तिच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर बर्‍यापैकी काम करत आहे. अलीकडेच ती तिच्या जिम सेशननंतर बाहेर पडताना दिसली. जेव्हा फोटो घेणार्‍या फोटोग्राफरने रियाला विचारले की, कशा आहात आपण, तर रिया क्षणभर थांबली आणि उत्तर दिले की, ठीक होत आहे. असं म्हणत रिया तिच्या कारमध्ये बसली आणि कारचा दरवाजा बंद केला. रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

 

 

 

 

रिया चक्रवर्तीने यावेळी ब्लॅक कलरचा टॉप घातला होता आणि ग्रे कलरची टाइट्स परिधान केली होती. कोरोनाचा धोका लक्षात घेता तिने यूनिक मास्क घातला होता. खुल्या केसांसह तिने स्लिंग बॅगही कॅरी केली होती आणि हातात पाण्याची बाटली होती. दरम्यान, रिया यापूर्वी तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीसोबतही दिसली होती.

घराच्या शोधात बाहेर पडले होते भाऊ- बहिण
रियाचा भाऊ शोविकला ड्रग्स बाळगल्याचा आणि खरेदी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 4 सप्टेंबर रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शोविकच्या घरी छापा टाकला होता, त्यानंतर शोविक आणि रिया यांना अटक करण्यात आली. पूर्वी या दोघांचे व्हिडिओ बर्‍यापैकी व्हायरल झाले होते, त्यामध्ये रिया आणि शोविक मुंबईच्या रस्त्यावर नवीन घर शोधताना दिसले.