खळबळजनक खुलासा ! ‘कास्टींग काऊच’बद्दल अभिनेत्री ऋचा चड्डा म्हणाली – ‘त्याने टच करत मला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या वर्षी मीटू कॅम्पेन अंतर्गत अनेक महिलांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा खुलासा केला. यात अनेक बड्या कलाकारांचे नाव समोर आले. अनेक अभिनेत्रीही पुढे आल्या आणि त्यांनी आपल्यावरील अत्याचाराची कहाणी सांगितली. नुकताच जरीन खान आणि एली अबरामने कास्टींग काऊचबद्दल मोठा खुलासा केला होता. यानंतर आता ऋचा चड्डानेही आपल्यासोब झालेल्या घटनेबद्दल सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/B3jGNZgjmGh/

एका मुलाखतीत बोलताना ऋचा म्हणाली, “अनेकदा मला लोकांचे इशारे समजलेच नाही. त्यावेळी मी खूपच यंग होते आणि मला त्याकाळी खूप कमी समज होती. एकदा एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हणाला आपल्याला सोबत डिनरवर जायला हवं.”

https://www.instagram.com/p/B2rbH6fjrwJ/

ऋचा पुढे म्हणाली, “त्यावेळी मला त्याचा अर्थ समजला नव्हता. मी त्याला उत्तर दिलं की, मी डिनर केलं आहे. तरीही त्याने टच करत मला म्हटलं की, आपण डिनर करायला हवं. तेव्हा मला कळालं की, त्याला काय म्हणायचं आहे.”

https://www.instagram.com/p/B2geWJNDn-3/

ऋचाने सांगितले की, “हे केवळ एकदाच नाही झालं तर, इंडस्ट्रीत अ‍ॅक्टर म्हणून मी आले तेव्हा हे पु्न्हा झालं. सध्या यातून मी माझी सुटका करून घेतली आहे. मला माहिती आहे की मला तो प्रोजेक्ट मिळाला नाही परंतु मला त्याने काही फरक पडत नाही.”

https://www.instagram.com/p/B2RrPGDDceV/

https://www.instagram.com/p/B0limWFDZcP/

https://www.instagram.com/p/BzvirQ5jwiV/

Visit : Policenama.com