रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र व्हावे : बाबा कांबळे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई ,वाचनालय ,फोनबुकिंग केंद्र ,सेवा केंद्र अस्या सुविधा द्यावेत तसेच रिक्षा स्टॅन्ड वर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेवा द्यावी ,अशा प्रकारे चांगली सेवा आणि ईतर सुविधा देऊन पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र झाले पाहिजे, यासाठी रिक्षा चालकानी प्रयत्न करावेत असे आव्हान महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांना केले.

चिंचवड  प्रेमलोक पार्क येथे प्रेम लोक  रिक्षा स्टॅन्डच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न प्रेम लोकपार्क रिक्षा स्टँडचे उदघाटन नुकतेच बाबा कांबळे यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे, वाकड विभाग अध्यक्ष गफूर शेख ,विभाग  अध्यक्ष अजित बराटे, कुदरत खाण, जेष्ठ नागरिक रमेश  केळकर,सदाशिव पवार, सुनिल चिंचवडे, सुधिर अगवणे, विजय कोरपे, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन स्टँड अध्यक्ष दिपक खंडागळे, मधू नागवेकर, अकलम शेख, शिवाजी कवडे, गणेश भागात, अफसर भालदार, शंकर खंडागळे, विनोद कळलीगपुरं यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षा चालकाबद्दल अनेक गैर समज आहेत तसेच रिक्षा व्यवसायात स्पर्धा आहेत , यामुळे रिक्षा व्यवसाय हा चिकाटीने करावा या बरोबरच रिक्षा चालकांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करावेत  रिक्षा चालकासाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा झाली आहे रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा मिळेल हे लाभ घेत असताना रिक्षा चालकांनी ” सेवा हाच धर्म ” मानून काम करावे रिक्षा स्टॅन्ड समाजसेवा केंद्र करावे असे बाबा कांबळे म्हणाले.