‘टॉप’च्या अभिनेत्रींना मागे टाकत रिंकु राजगुरू ठरली मराठीतील सर्वात ‘महागडी’ अभिनेत्री, जाणून घ्या ‘मानधन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील कलाकारांच्या मानधनाला घेऊन नेहमीच चर्चा होत असते. याशिवाय मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकर, प्रिया बापट, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या तगडं मानधन घेतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री नेमकी कोणती आहे. मराठीच्या टॉपच्या अभिनेत्रींना आता सैराटची आर्ची म्हणजेच रिंकु राजगुरू हिनं मानधनाच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

तुम्हाला माहीत नसेल परंतु पूर्वी सई ताम्हणकर, अमृता खानविलकर सोनाली कुलकर्णी यांच्या मानधनाची चर्चा व्हायची. परंतु सैराट सिनेमा आला आणि आर्ची म्हणजे रिंकु राजगुरू घराघरात पोहोचली. आपल्या अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री रिंकु प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांमध्ये रिंकुची लोकप्रियता आहे. रिंकु राजगुरू सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झाली आहे.

रिंकुनं तिचा आगामी सिनेमा मेकअपसाठी तब्बल 27 लाख रुपये घेतले आहेत. मराठीतील ग्लॅमरस अॅक्ट्रेस साधारणपणे 15 लाखांच्या घरात मानघन घेत होत्या. रिंकुनं मात्र आता सगळ्याच अॅक्ट्रेसला मागे टाकल्याचं दिसत आहे.

रिंकुच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर झाले तर सैराटनंतर रिंकु कागर या सिनेमात दिसली होती. रिंकु लवकरच आता मेकअप या सिनेमात दिसणार आहे. अलीकडेच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात ती वेगळ्या आणि लुकमध्ये आणि बोल्ड अंदाजात दिसणार आहे. मेकअप सिनेमाच्या टीजरने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिनमातील गाणीही रिलीज झाली आहेत. सैराट सिनेमा येऊन 3 वर्षे झाली आहेत तरीही तिच्या लोकप्रियतेत कसलीच कमतरता जाणवत नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like