‘वाईट वाटले असेल तर माफी मागतो’; फाटलेल्या जीन्सच्या वक्तव्यानंतर बॅकफूटवर आले CM तिरथ सिंह रावत

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत सातत्याने मथळे बनवीत आहेत. पूर्वी ते मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेत होते. आता त्यांच्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उत्तराखंडच्या मुखमंत्र्यांनी सांगितले होते की आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालतात. हे सर्व ठीक आहे…. हे संस्कार कसे आहेत? त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याबद्धल बरेच बोलले जात आहे. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की त्यांना फाटलेल्या जीन्सबद्धल कोणता आक्षेप आहे?

या प्रश्नाचे उत्तर देताना ते हसत म्हणाले की मी एका सामान्य गरीब परिवारातून आलो आहे. जेव्हा आम्ही शाळेला जात होतो तेव्हा जर आमची पॅन्ट फाटलेली असली तर त्यावेळी शिस्त आणि गुरुजींच्या भीतीने आम्ही त्यावर टॅग लावत होतो. म्हणजेच आम्ही फाटलेला भाग झाकून टाकायचो, गुरुजी चिडू नयेत म्ह्णून. आताची मुले २००० ते ४००० ची जीन्स घेतात तेव्हा ते पाहतात की जीन्स आधी फाटलेली आहे की नाही. जर ती जीन्स फाटलेली नसेल तर घरी जाऊन त्यावर आधी कात्री लावली जाते.

ते पुढे म्हणाले की जर संस्कार आणि शिस्त कुटुंबात असे तर तो कधीही अपयशी होणार नाही. केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर मुलांना या रूपात साकारले पाहिजे, मग मी त्याबद्धल काय वाईट बोललो?

ते पुढे म्हणाले, मलाही एक मुलगी आहे आणि हा नियम तिलाही लागू होईल. मी फक्त इतरांबद्धल बोलत नाही. वातावरण आणि मूल्ये कशी असावीत हे मी फक्त सांगत आहे. मी तिथेही हेच बोललो होतो, कार्यक्रमही तसा होता आणि विषयही तसाच होता. .

मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की जीन्समुळे समस्या आहे अथवा फाटलेली जीन्समुळे समस्या आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की मला जीन्सबद्धल नाही तर फाटलेल्या जीन्सचा आक्षेप आहे. मी स्वतः जीन्स घालतो आणि आता जर कोणाला असे काहीतरी घालायचे असेल तर मी काय करावे? माझ्या बोलण्यामुळे कुणाला दुःख वाटल्यास मी दिरगिरी व्यक्त करतो.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेतलेला महत्वपूर्ण निर्णय
सीएम तिरथ सिंग रावत यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा केली. त्याअंतर्गत कुंभला दिव्य आणि भव्य बनविण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामात शिथिलता देण्यात आली आहे. यासोबत कुंभमेळा २०२१ अंतर्गत हरिद्वारमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट साठी ३६६४.६० लाखांच्या कार्याच्या रिपॅकेजिंग करत ५ पॅकेज तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय पावरच्या टेंडरमध्ये २४९.७६ लाखांपेक्षा अधिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

तिरथ सिंग रावत कोण आहेत?
गढवालमधील कलगिखल विकासखंडचे सिरोनमध्ये ९ एप्रिल १९६४ ला तिरथ सिंग रावत यांचा जन्म झाला. विद्यार्थी वयापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. ते हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठातून विध्यार्थी संघटनेचे अध्यक्षही राहिले.

रावत हे २०१२ तें २०१७ मध्ये उत्तराखंड विधानसभेचे सदस्य राहिले. विधानसभेत त्यांनी चौबट्टाखाल मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते बीजेपीचे प्रदेश अध्यक्षही राहले. उत्तराखंड राज्य निर्मितीच्या चळवळीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. राज्य स्थापनेनंतर ते इथल्या पहिल्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री झाले.

रावत यांना मुख्यमंत्री करण्याचा भाजप नेतृत्वाचा निर्णयही धक्कादायक होता. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत धनसिंग रावत, केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयल निष्ण्क, खासदार अजय भट्ट आणि अनिल बलूनी यांची नावे चर्चेत होती, पण बाजी तिरथ सिंग रावत यांनी मारली.