Riteish Deshmukh | अभिनेता रितेश देशमुखने भारत जोडो यात्रेदरम्यानचा फोटो केला ट्वीट ; पोस्ट Viral

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा नेहमीच चर्चेत असतो. हिंदी असो अथवा मराठी सिनेमे सृष्टीत त्याचे अभिनयाचे धडे प्रत्येक जण अभिमानाने सांगतात. रितेशच्या अभिनयाचे प्रत्येक जण भरभरून कौतुक देखील करतात. एवढेच नाही तर रितेश (Riteish Deshmukh) त्याचे वडील म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Former Chief Minister of Maharashtra Vilasrao Deshmukh) यांच्या खूपच जवळ होता. आज देखील वडिलांची आठवण होताच तो भावुक होतो. अशाच पद्धतीची एक पोस्ट रितेशने ट्विटरवर शेअर केली आहे . सध्या ती जोरदार वायरल होत आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra) चर्चा सर्वत्र सुरू आहे. महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रेला लोकांचा प्रतिसाद तसा चांगला मिळत आहे. याच दरम्यानचा हा फोटो रितेशने (Riteish Deshmukh) ट्विट केला आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो हातात घेऊन चालताना दिसत आहे. हे पाहून रितेश ला खूपच अभिमान वाटला आणि त्यांनी हा फोटो ट्विट केला. या फोटोबद्दल बोलताना रितेश म्हणाला हा फोटो पाहून मी खूपच भावुक झालो. वडिलांसाठी ही खास पोस्ट आहे. लोकांचे आपल्या वडिलांवर असणार प्रेम पाहून मला खूपच अभिमान वाटत आहे.

तर रितेशने शेअर केलेल्या या पोस्ट वर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.
तर काही नेटकरी रितेश ला “तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये कधी सहभागी होणार?”
“तुम्ही या यात्रेमध्ये दिसत नाही तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी व्हा”
असे एक ना अनेक कमेंट्स या फोटोवर सध्या येत आहेत.
तर अनेकांनी विलासराव देशमुख तुमची नेहमीच आठवण असणार असे देखील म्हटले आहे”.

 

Web Title :- Riteish Deshmukh | actor riteish deshmukh emtional after see his father vilasrao deshmukh photo in rahul gandhi bharat jodo yatra see pic

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Inflation | सोने-चांदी आणि पामतेल पुन्हा एकदा महागले

Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू