रितेशने जेनेलियासाठी केला ‘असा’ लुक ; कोणी म्हटलं पोपट, कोंबडा तर एकजण म्हणाला GAY

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या कॉमेडीने आणि दमदार अदाकारीने सर्वांना हसवणारा अभिनेता रितेश देशमुख आपल्या बदलत्या लुक्सने नेहमीच चर्चेत असतो. रितेश अनेकदा सिनेमासाठी तर कधी हौस म्हणून आपल्या लुक मॉडिफाईड करत असतो.

अशातच तो पु्न्हा एकदा आपल्या लुक्समुळे चर्चेत आला आहे. असे समजत आहे की, आपली बायको जेनेलिया डिसूजाला सरप्राईज करण्यासाठी हा लुक केला होता. परंतु त्याला हे सरप्राईज सोशलवर महागात पडल्याचे दिसत आहे. या नवीन लुकमुळे रितेश ट्रोल होताना दिसत आहे.

खास बात अशी आहे की, रितेशचा रेड स्क्वायरल टेल लुक चर्चेत आला आहे. या नवीन लुकमुळे ट्रोलर्स रितेशला ट्रोल करताना दिसत आहेत. जेनेलियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रितेशचा कोलाज केलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रितेशच्या नवीन हेअरस्टाईलची झलक पाहायला मिळत आहे.

जनेलियाने या फोटोला कॅप्शन दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये जेनेलिया म्हणते की, “मी रितेशला सांगितले होते की, मला नवीन लुक करत मला सरप्राईज दे. यानंतर तो रेड स्क्वायरल लुकमध्ये समोर आला. हा लुक कूल नाही का ?” जेनेलियाच्या याच प्रश्नाला लोक गंमतीशीर उत्तरे देताना दिसत आहे. काही लोक तर रितेशच्या या लुकवर नाखुश असल्याचेही दिसत आहे.

एका युजरने या फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे की, “माणूस आहे की पोपट ?” एकाने लिहीले की, टेल सोडली तर बाकी सगळं ठीक आहे. आणखी एक युजर म्हणतो की, कोंबड्याची चोच कशी आहे. एवढेच नाही तर एकाने तर रितेश देशमुखला थेट गे म्हटले आहे.