Riteish Deshmukh | रितेश देशमुख आणि जेनेलियाचा नवा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही जोडी नेहमीच चर्चेत असते. कधी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार केल्यामुळे तर कधी त्यांच्या रिल्समुळे ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर वायरल होत असते. आता रितेश (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया चा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी टिझर आउट करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख घोषित केली आहे.

 

‘बंटी और बबली’ (Bunty Aur Babli) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे शाद अली (Shaad Ali) यांनी या नव्या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy) असे चित्रपटाचे नाव असून येत्या 18 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिस्टर मम्मी ची निर्मिती भूषण कुमार (Bhushan Kumar) यांची कंपनी टी सिरीज, कृष्णकुमार अली (Krushnakumar Ali) आणि शिव अनंत (Shiv Aanat) यांनी केली आहे.

 

टि सीरिजच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
चित्रपटाशी घोषणा करताना ट्विटर मध्ये असे लिहिले होते की “तुम्हाला एका अनोख्या प्रवासावर घेऊन
जाणारी आनंदाची बातमी म्हणजेच मिस्टर मम्मी येत्या 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात”.
रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सध्या चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

Web Title :- Riteish Deshmukh | mister mummy riteish deshmukh and genelias mr mummy will visit on this day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Kapoor | इतर अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा कपूरने गाठला ‘हा’ सगळ्यात मोठा टप्पा

Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

T20 World Cup | ‘या’ दोन टीममध्ये होणार टी20 वर्ल्ड कपची फायनल, ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी