Riteish Deshmukh | रितेशने वडील विलासराव देशमुखांची लग्नपत्रिका शेअर करत दिला आठवणींना उजाळा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Riteish Deshmukh | सुप्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांने आपले वडील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या लग्नाची पत्रिका समाज माध्यमांवर शेअर केली आहे. ही लग्नपत्रिका आता समाज माध्यमांवर प्रसारीत होताना दिसत आहे.

 

आज (सोमवार) रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) वडील विलासराव देशमुख यांची लग्नपत्रिका (Wedding Magazine) शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विलासराव देशमुख कालच्याच दिवशी म्हणजे 29 मे 1975 रोजी विवाहबद्ध झाले होते. या आठवणीत रितेशने त्यांच्या लग्नाची पत्रिका ट्विट करत शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित होताना दिसत आहे.

 

गेल्या काही दिवसांपुर्वी रितेशने विलासराव देशमुख यांच्या जन्मदिवशी (Birthday) एक भावूक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये रितशने लिहिलं आहे की, “पप्पा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…मी तुम्हाला खूप मिस करतोय. मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमच्या पायांना स्पर्श करुन मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे.

 

त्याने पुढे असेही लिहलं आहे की, मला तुम्हाला पुन्हा एकदा हसताना बघायचंय.
माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत तुझ्याबरोबर मी असेन, असं तुमचं शब्द मला ऐकायचे आहेत.
तुमचा हात हातात धरुन मला चालायचं आहे. नातवंडांना खेळवताना, त्यांना गोष्टी सांगताना तुम्हाला पाहायचंय.
तुम्ही मला माझ्यासोबत हवे आहात पप्पा. मला खूप आठवण येतीय तुमची. अशी पोस्ट शेअर केली होती.

 

Web Title :- Riteish Deshmukh | riteish shared a wedding card and remembered vilasrao deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा