Aurangabad News : डॉक्टराच्या घरावर धाडसी दरोडा, तब्बल 70 लाखाचा ऐवज लंपास

औरंगाबादः पोलीसनामा ऑनलाईन – बंद घराचा दरवाजा तोडून चोरटयांनी डॉक्टराच्या घरातील तब्बल 100 तोळे सोने आणि 10 लाखांची रोकड असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. शहरातील प्रतापनगर भागात मंगळवारी (दि. 23) रात्री ही घटना घडली. बुधवारी सकाळी जेंव्हा घरातील काम करणारे नोकर साफसफाईसाठी आले. तेंव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. पण संचारबंदीच्या पहिल्याच रात्री धाडसी दरोड्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.सुषमा सोनी हे परिवारासह देवदर्शनासाठी बाहेर राज्यात गेले आहेत. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यानी घराला लक्ष केले. घराचा समोरील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरात कपाटात ठेवलेले सुमारे 100 तोळे सोन्याचे दागिने व रोख 10 लाख रुपये असे सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपयुक्त निकेश खाटमोडे, उपयुक्त दीपक गिर्हेसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.