आश्‍चर्यजनक ! गांधी घराण्याचे जावाई रॉबर्ट वाड्रा यांना भेटली ‘भविष्य’ सांगणारी गाय (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील विविधतेचे वर्णन करत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी भारताच्या संस्कृतीचे वर्णन केले आहे. भारताच्या रस्त्यांवर चालताना तुम्हाला अनेक गोष्टी मिळतात, असं म्हणत त्यांनी रोडवरील भविष्य सांगणार्‍या गायीचा फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना त्यांनी छान कॅप्शन दिले आहे. ही गाय डोक हलवून आपले भविष्य सांगते. अशा महान देशाचा नागरिक असल्याचे मला आनंद आहे, असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच त्यांनी यावेळी देशातील विविधतेचे कौतुक केले आहे.

भारतातील विविधता आणि अधिकाधिक प्रतिभा असल्याने मी या देशाच्या प्रेमात आहे. तुम्ही भारताच्या रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये खुप काही शिकु शकता. लोकांची मदत करू शकता, त्यानंतर आपल्या कौतुकासाठी त्यांच्या चेहऱ्यावरील हसू येते ते तुम्हाला आवडेल. तसंच ही पवित्र गाय आपल्याला आपले भविष्यही सांगते. ही गाय आपले डोके हलवून प्रश्नांची उत्तरे देते. या महान देशाचा मी नागरिक असल्याचा मला अभिमान आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या फोटोंमध्ये त्यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. ही गाय मला सर्व सांगेल का, असा प्रश्न त्यांनी पुजाऱ्याला विचारले आहे. त्यावर पुजाऱ्यानेही त्यांनी सांगितलं की, ही गाय तुम्हाला सर्व काही सांगेल तसंच तुम्हाला आशीर्वाद देईल. त्यानंतर रॉबर्ट वड्रा यांनी गायीला गोंजारले आहे, असा हा व्हीडिओ आहे.

आरोग्यविषयक वृत्त