Arogya Rakshak | LIC ने लाँच केला आरोग्य रक्षक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन, मिळतात ‘हे’ सर्व फायदे; जाणून घ्या

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) Arogya Rakshak नावाचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन लाँच केला आहे. या विमा योजनेची सुरुवात आजपासून झाली आहे. हा प्लान नॉन लिंक्ड, नॉन पार्टीसिपेटिंग, रेग्युलर प्रीमियम पर्सनल इंश्युरन्स प्लान आहे. या प्लानचे वैशिष्ट्य हे आहे की जर कोणताही धोकादायक आजार झाला तर त्यावर हा निश्चित लाभ देतो. सोबतच इमर्जन्सीत पैशांची गरज पडल्यास त्या कठिण काळात कुटुंबियांना यातून आर्थिक मदत सुद्धा मिळते. कुणीही व्यक्ती या प्लान अंतर्गत स्वताचा किंवा कुटुंबात पत्नी, मुले, आई-वडीलांचा विमा (arogya rakshak health insurance plan) काढू शकतो.

प्लानची वैशिष्टय

या योजनेंतर्गत मुख्य विमित व्यक्तीचे वय 18 वर्ष ते 65 वर्ष वय आणि मुलांचे वय 91 दिवसापासून 20 वर्ष वयासाठी उपलब्ध आहे. गार्डियनसाठी याचे कव्हर पीरियड 80 वर्षाच्या वयापर्यंत आणि मुलांसाठी 25 वर्षापर्यंतसाठी आहे.

पॉलिसी अंतर्गत मिळतात हे फायदे

– पॉलिसी निवडण्यासाठी फ्लेक्सिबल लिमिट

– सोप्या आणि सुविधाजनक प्रीमियम पेमेंटचा पर्याय

– हॉस्पिटलमध्ये भरती होणे किंवा सर्जरी इत्यादी प्रकरणात व्हॅल्युएबल फायनान्शियल प्रोटेक्शन

– वास्तविक वैद्यकीय खर्चावर लक्ष दिल्याशिवाय एकरकमी लाभ

– ऑटो स्टेप अप बेनिफिट आणि नो क्लेम बेनिफिटच्या माध्यमातून हेल्थ कव्हर वाढवणे.

– जर एकापेक्षा जास्त सदस्य एखाद्या पॉलिसी अंतर्गत येतात तर मुळ विमित व्यक्ती अर्थात पॉलिसीधारकाचा इन्श्युर्ड वेळी दुर्दैवी मृत्यूच्या बाबतीत इतर विमित व्यक्तींसाठी प्रीमियम सूटचे धोरण

– काही प्रमुख सर्जिकल लाभांसाठी कॅटेगरी I किंवा कॅटेगरी II च्या अंतर्गत येणार्‍या कोणत्याही विमित सर्जरीच्या स्थितीत एक वर्षासाठी प्रीमियम सूट लाभ.

– अ‍ॅम्ब्युलन्स लाभ.

– आरोग्य तपासणीचा फायदा.

हे देखील वाचा

SBI मध्ये उघडले ‘हे’ खाते तर मुलांना सुद्धा मिळेल ATM कार्ड, ते दररोज काढू शकतील 5000 रूपये, जाणून घ्या

Pune Crime | लष्कर कॅन्टोंमेंटचा माजी नगरसेवक विवेक यादवनं नामचीन गुन्हेगाराच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड, 2 सुपारी किलर अटकेत; मोठा शस्त्रसाठा जप्त, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  rogya rakshak | life insurance corporation of india lic launches lic arogya rakshak health insurance plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update