Rohit Pawar On Ajit Pawar | एरवी रुबाबदारपणे तिकीटे वाटणाऱ्या हातांना आज…, अजित पवारांचे नाव न घेता रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar On Ajit Pawar | एरवी रुबाबदारपणे तिकीटे वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढे करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकीटे पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे, अशी खंत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता व्यक्त केली आहे.(Rohit Pawar On Ajit Pawar)

या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, एकेकाळचा त्यांचा चाहता आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचे वाटते की, एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय. आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील, अशी शक्यताही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मतदानाची किंमत अधिक असून स्वतःला विकणाऱ्या नेत्यांना मत देऊन त्याची किंमत घालवू नये, असे आवाहन केले आहे.

आज काही कथित थोरांमुळे लोकशाहीवर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी या चिमुकल्या पोरांनी बनवलेला व्हाटसअ‍ॅपवर
आलेला हा व्हिडिओ प्रत्येकाने बघावा, असे आवाहन रोहित पवार यांनी लोकांना केले आहे.

रोहित पवारांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मलिदा गँगला इशारा देताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,
आज सामान्य लोकांचे मतपरिवर्तन झालेच आहे. पण मलिदा गँगचही होईल ही अपेक्षा!

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
या व्हायरल व्हिडिओमध्ये लहान मुलांनी हातात फलक घेतले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला पहिलाच फलक येतो,
ज्यात लिहिले आहे आजचा बाजारभाव, दुसऱ्या फलकावर पाळीव जनावरांचा भाव दाखवला आहे.

म्हैस ८० हजार, बैल ५० हजार, शेळी १० हजार, कुत्रा ५ हजार आणि निवडणुकीत स्वतःला विकणाऱ्या माणसाची किंमत ५००
ते १००० रुपये फक्त. पुढील फलकावर लिहिले आहे, स्वतःला विकणाऱ्याला सांगा.
तुझ्यापेक्षा कुत्रं महाग आहे. स्वाभिमानाने मतदान करा, असे या व्हिडिओत दाखवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivajirao Adhalrao Patil Join NCP | शिंदे सेना सोडून आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल, अजित पवारांनी केले स्वागत, आता कोल्हेंविरूद्ध लढणार

Drunk and Drive Action In Pune | पुणे : 142 तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी गुन्हा दाखल, वाहतूक विभागाची कारवाई

Arrest In Vehicle Theft | दुचाकी चोरट्यांना दिघी पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू