Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा अजितदादांवर पुन्हा घणाघात, ”ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, 2019 पासून भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar On Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांच्याविरोधात सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे. ते सातत्याने अजितदादांवर (Ajit Pawar) टीकास्त्र डागत आहेत. अजित पवार यांनी बारामती लोकसभेसाठी उमेदवारी (Baramati Lok Sabha) अर्ज घेतल्यानंतर, त्यांनी खोचक टीका केली होती. आता त्यांनी अजित पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचे म्हटले आहे. ते इंदापुर (Indapur Sabha) येथे प्रचारसभेत बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाही, २०१९ पासूनच सुरू भाजपसोबत जाण्याचे प्लॅनिंग होते. पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही असा त्यांचा अलिखित नियम होता, म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो. अजित पवारांनी भाजप (BJP) सोबत जाण्याचा निर्धार २०१९ मध्ये केला होता. हे मी नाही त्यांचे नातेवाईक सांगतात. मनात २०१९ पासून साहेबांना सोडण्याचा प्लॅन करत होते. दादा सत्तेपासून दूर राहू शकत नाही. दादा आणि त्यांच्या सोबत गेलेले नेते सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत.

सोनाई डेअरीचे (Sonai Dairy) चेअरमन प्रवीण माने (Pravin Mane) यांच्याबाबत रोहित पवार म्हणाले, प्रविण माने यांचा व्यवसाय आहे. शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रविण माने यांना मदत केली. त्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) धमकी देत असतील त्याला ते घाबरले. इथल्या लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडून येणार आहेत. सगळे नेते का गेले आहेत आपल्याला माहीत आहे.
भाजप नेते यांना धमक्या देत आहेत की आम्ही फाईल बाहेर काढू म्हणून.
मोहिते कुटुंबातील लोकांनी परत यायचा निर्णय घेतला, असे पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, आता इंडिया आघाडीचे सरकार (INDIA Aghadi Govt) येणार आहे.
तुम्ही कितीही बोला केंद्रात सुप्रियाताईच निवडून जाणार. सुनेत्रा काकी (Sunetra Ajit Pawar) जाणार नाहीत.
अजित पवारांनी साहेबांना सोडलं त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरती विश्वास नाही. साहेबांना सोडून तुम्ही भाजपसोबत गेलाय किती लोकांना आवडलं? एका बाजूला तुम्ही म्हणता वातावरण भावनिक करू नका आणि तुम्हीच भावनिक करता.

बारामती लोकसभेसाठी सुनंदा पवार यांनी घेतलेल्या उमेदवारी अर्जाबाबत रोहित पवार म्हणाले, आई साहेबांच्या
मार्गदर्शनाखाली फॉर्म घेतला आहे. तो घ्यावा लागतो. माझी आईसुद्धा बाहेरून आली आहे.
माझ्या आईला फॉर्म साहेबांनी घ्यायला लावला आहे.

राजकीय दृष्टिकोनातून अजित दादा वेगळ्या दृष्टिकोनाचे झालेत. आम्ही कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम करतो.
दादा स्वतः एकटे दूर गेले. ही विचाराची लढाई आहे. आम्ही चर्चेने मार्ग काढतो परंतु महायुतीत आदेश येतात
त्यांच्याकडे हुकूमशाही आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

JM Road Firing Pune | पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा हल्लेखोरांकडून व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न (CCTV Footage Video)

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांच्या रडारवर पुणेकर! एस्कॉर्टच्या नावाखाली तरुणाची फसवणूक