Rohit Pawar On Scam In Health Department | पुण्यातील २ कंपन्यांची नावे घेत रोहित पवारांचा आरोग्य मंत्र्यांवर साडेसहा कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, राजीनाम्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar On Scam In Health Department | आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर दिले. त्याद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

रोहित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) अमित साळुंखे (Amit Salunkhe) नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे. या प्रकरणात साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला. सावंत यांना मी पाच दिवसाचा वेळ देतो त्यांनी बाजू मांडावी, असे आव्हान देत रोहित पवार म्हणाले, आरोग्य विभाग हा खेकडा पोखरत असून पारदर्शक प्रक्रिया राबवावी.

रोहित पुढे पवार म्हणाले, निवडणुक फंड देण्यासाठी बीव्हीजी आणि सुमित कंपनीवर मेहरबानी दाखवली. नियम वळवले, टेंडर डिझाईन करून वळवले. या भ्रष्टाचाराचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा केला.

आरोग्य मंत्र्यांवर गंभीर आरोप करताना रोहित पवार म्हणाले, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला.
त्यांनी राज्याला भिखारी केले. सरकारने त्यांची सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी राजीनामा द्यावा.

रोहित पवार म्हणाले, सुमित फॅसिलिटी या पिंपरी चिंचवडमधील कंपनीला अ‍ँब्यूलन्स चालविण्याचा अनुभव नव्हता.
मात्र तरीही मुख्यमंत्री दावोसला गेल्यावर एका स्पॅनिश कंपनीसोबत या सुमेत कंपनीचा करार केला.
त्यानंतर बीव्हीजी कंपनीचा सुद्धा याच कंत्राटात समावेश केला. बीव्हीजी बाबत अनेक तक्रारी आहेत.
अनेक राज्यांत बीव्हीजी ब्लॅक लिस्टेड आहे. तरीही या कंपनीला कंत्राट दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat On Congress | संजय शिरसाट यांचे खळबळजनक वक्तव्य, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा, शिंदे गटाला छुपा पाठिंबा, लवकरच…

Sanjay Raut On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना जॉनली लीवरशी, संजय राऊत म्हणाले, ”रोज नवे जोक, देशात…”