सरकार बंद करू इच्छिते 2 हजार रुपयांची नोट? 2 वर्षांपासून अद्याप नाही छापली एकही नोट

पोलिसनामा ऑनलाईन – सरकार आता दोन हजार रूपयांची नोट बंद करू इच्छित आहे. होय… तसं सरकारने लोकसभेत सांगितले की, मागील दोन वर्षात 2 हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही, तर त्याची संख्या आता खाली आली आहे. वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी संसदेला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, 30 मार्च 2018 रोजी 2000 रुपयांच्या 336.2 कोटी नोटा चलनात आल्या. तर 26 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांची संख्या 249.9 कोटींवर इतकी राहिली आहे.

वित्त राज्यमंत्री पुढे म्हणाले, सार्वजनिक व्यवहारांची मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयच्या सल्ल्यानुसार कोणत्याही किंमतीच्या नोटा छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2019-20 आणि 2000 रुपयांच्या नोटांची छपाई 2020-21 मध्ये आदेश मिळालेला नाही. ’

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये सांगितले होती की, 2016-1-17 (एप्रिल 2016 ते मार्च 2017) या आर्थिक वर्षात 354.2991 कोटी नोटा छापल्या गेल्या. तथापि, 2017 – 2018 मध्ये केवळ 11.1507 कोटीच्या नोटा छापल्या गेल्या. 2018 – 2019 मध्ये 4.669 कोटी नोटा छापल्या गेल्या आणि एप्रिल 2019 पासून एकाही नोटा छापली गेली नाही.

काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असं मानलं जात आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून गेल्यानंतर सरकारने नवीन 500 रुपयांची नोट आणि 2 हजार रुपयांची नोट जारी केली. 2000 रुपयांच्या नोटशिवाय सरकारने 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नवीन नोटा छापल्या.

आता सरकारने 2000 हजार रूपयांची नोट जरी छापली नसली तरी ती चलनात बर्‍याच ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे या नोटे मुळे सुट्टे पैसे मिळणे अनेकांना अवघड झालं आहे.