RSSवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत : अकबरुद्दीन ओवैसी

हैदराबाद : वृत्तसंस्था – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मात्र आजारपणातून बाहेर येताच त्यांनी पुन्हा एकदा आपला आक्रमक पवित्रा सुरु केला आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. हे जग त्याच व्यक्तीला घाबरवते जो घाबरतो. पण जग त्याच व्यक्तीला घाबरते जो दुसऱ्यांना घाबरवतो, असं त्यांनी म्हटलं. तसंच त्यांनीच मागे केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी यावेळी मत मांडले. मागे मी १५ मिनिटांचे वक्तव्य केले होते. ते वक्तव्य अनेकांच्या वर्मी लागले होते. माझ्या त्या वक्तव्याचे घाव ते अजून भरू शकले नाहीत. त्यामुळेच ते अकबरुद्दीन ओवैसीचा इतका द्वेष करतात, असं त्यांनी सांगितलं.

तसंच यावेळी त्यांनी वाढलेल्या मॉब लिंचिंगवरही वक्तव्य केले. तुमच्यासमोर कुठलीही घोषणाबाजी झाली किंवा तुमच्यावर घोषणा देण्यासाठी प्रवृत्त केले तर तुम्ही केवळ अल्लाचे नाव घ्या, असं म्हटलं आहे. तसंच यापूर्वी त्यांनी करीमनगर येथील सभेत बोलताना मुसलमानांनी वाघासारखे शूर राहिले पाहिजे, असं म्हटलं होते.

दरम्यान, अकबरुद्दीन हे नेहमीच वादग्रस्त आणि भडकावू वक्तव्य करत असतात. २०१३ मध्ये त्यांनी भडकावणारे वक्तव्य केले होते. आम्ही २५ कोटी आहे आणि तुम्ही हिंदू १०० कोटी आहात. १५ मिनिटांसाठी पोलीसांना हटवा, मग पाहू कोणामध्ये किती दम आहे, असं त्यांनी म्हटलं होते. त्यावरून त्यांच्यावर अनेक टीका झाल्या होत्या. तसंच मोठा वादही झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त –