‘डॉलर’च्या तुलनेत २१ पैसे मजबूत झाला ‘रुपया’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉलरच्या तुलनेत आज मंगळवारी भारतीय रुपया आणखी बळकट झाला आहे. सकाळी ९ वाजता रुपयाच्या मूल्यात ११ पैशांची वृद्धी झाली असून रुपयाने ६९. ४६ असा नवा दर नोंदवला. मागील सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया ४४ पैशांनी वधारून ६९. २५ वर पोहचला होता. डॉलरची स्थिती काहीशी कमजोर झाल्याने रुपयाची स्थिती सावरली.

या कारणामुळे  रुपया मजबूत –

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये घट झाल्यामुळे  तसेच आरबीआयकडून व्याजदर कमी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुपया मजबूत झाला आहे.

रुपया बळकट झाल्यामुळे होणारे परिणाम –

डॉलर घसरल्याने आयत करणं स्वस्त होईल. त्यामुळं इतर देशांशी व्यापार करताना भारताला कमी पैसे द्यावे लागतील. रुपयाची किंमत ही मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते.