रशियाच्या ‘सर्वोच्च’ पुरस्कारानं होणार PM मोदींचा गौरव ! मोदी म्हणाले, हा 130 कोटी भारतीयांचा ‘सन्मान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहे. तेथे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात व्लादिवोस्तोकमध्ये चर्चा झाली. मोदी यावेळी म्हणाले की, ईस्टर्न इकोनॉमिक फोरमसाठी तुमचे आमंत्रण माझ्यासाठी खूपच सन्मानीय आहे. ही दोन्ही देशांमध्ये एक नवी सुरुवात आहे.

रशियात पंतप्रधान मोदींना रशियाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने म्हणजे ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टलने गौरवण्यात येईल.

या दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही घोषणा केली ही मला रशियातील सर्वोच्च नागरिक म्हणजेच ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टलने सन्मानित करण्यात येईल. यासाठी मी तुमचा आणि रशियातील लोकांचा आभारी आहे. हे आपल्या दोन देशातील मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हा भारतातील 130 कोटी लोकांचा सन्मान आहे. या पुरस्काराची घोषणा या वर्षाच्या एप्रिलमध्ये करण्यात आली होती.

रशिया भारताचा विश्वासार्ह मित्र-

मोदी म्हणाले की, रशिया भारताचा विश्वासार्ह मित्र आहे. तुम्ही आमच्या विशेष आणि विशेषाधिकारिक नीतिवर लक्ष केंद्रीत केले. मी अनेक मुद्यावर तुमच्याशी फोनवर चर्चा केली, मला तुमच्याशी बोलताना कोणतीही समस्या जाणवली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –