Good News : रशिया भारतात ‘स्पुटनिक 5’ लशीचे 30 कोटी डोस बनवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी जगात प्रथम लसीकरणास सुरुवात करणाऱ्या रशियाने भारतात २०२१ पर्यंत ३० कोटी स्पुटनिक ५ लशींचे उत्पादन करणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी रशिया भारतातील ४ प्रमुख लस निर्मिती कंपन्यांशी चर्चा करणार आहे.

“भारत २०२१ मध्ये स्पुटनिक लशीचे ३० कोटी डोस तयार करेल. यासाठी भारतातील चार कंपन्यांशी बोलणी सुरु केली. भारत पुढील वर्षी ३० कोटी डोस तयार करु शकतो,” अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रेव यांनी सांगितलं आहे.

लसीची निर्मिती करणारी कंपनी गमालिया रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड माइक्रोबायोलॉजीने स्पुटनिक ५ ही लस ९१.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. जवळपास २३ हजार जणांवर याची चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लसीच्या ट्रायलचा डाटा लवकरच सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केला जाणार आहे. दरम्यान, रशियाच्या या लसीवर अनेक देशांनी शंका घेतली आहे.