Rutuja Latake | निवडणूक लढवणार तर मशाल चिन्हावरच, ऋतुजा लटके यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latake) यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुक (Andheri East by-Election) घेण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु आता ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा महापालिकेतील नोकरीचा राजीनामा (Resignation) मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर (Municipal Commissioner) दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) केला आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट देखील घेतल्याची चर्चा आहे. शिवसेनेने हा दावा फेटाळला आहे. लटके यांनी आता आपल्या उमेदवारीबाबात स्पष्ट केले आहे. मी निवडणूक लढवणार तर फक्त मशाल (Mashal Symbol) चिन्हावरच. आमचा पाठिंबा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आहे. तसेच माझ्यावर कोणाचाही कोणता दबाव नाही, असे देखील लटके यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे आरोप लटके यांनी फेटाळले आहेत.
माझी निष्ठा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहे. माझे पती रमेश लटके यांची देखील उद्धव ठाकरे यांच्यावरच निष्ठा होती.
मी आज महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे आणि यावेळी मी त्यांना माझा राजीनामा आजच्या आज स्वीकारण्याची विनंती करणार असल्याचे लटके म्हणाल्या.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने अ‌ॅड. अनिल परब (Anil Parab) आणि खासदार अरविंद (Arvind Sawant)
सावंत यांची लटके यांच्या राजीनाम्यासंबंधी आणि उमेदवारीसंबंधी एक पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी त्यांनी लटके यांच्या अर्जावर राजकीय दबावातून कार्यवाही करण्यास विलंब केला जात असल्याचे सागितले.
त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना,
लटके यांचा प्रलंबित अर्ज आणि अन्य राजकारण याचे पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :- Rutuja Latake | andheri east bypoll election 2022 shivsena uddhav balasaheb thackeray cnadidate ruruja latke first reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा