S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! पुणे पोलिसचा सलग दुसरा विजय; इव्हॅनो इलेव्हन संघाची विजयी कामगिरी

पुणे : S. Balan Cup T20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत पुणे पोलिस संघाने (Pune Police Team) सलग दुसरा विजय नोंदविला. इव्हॅनो इलेव्हन संघाने पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. (S. Balan Cup T20 League)

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुभम हरकाल याच्या ६१ धावांच्या जोरावर इव्हॅनो इलेव्हन संघाने अष्टपैलू स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा १५ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना इव्हॅनो इलेव्हनने १७२ धावा धावफलकावर लावल्या. शुभम हरकाल याने ६१ धावांची आणि निखील जोशी याने ५० धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाला उत्तर देताना अष्टपैलू स्पोर्ट्स फाउंडेशनचा डाव १५७ धावांवर मर्यादित राहीला. प्रफुल्ल मानकर याने नाबाद ६५ धावांची खेळी केली. पण संघाचा पराभव वाचवू शकला नाही. (S. Balan Cup T20 League)

पृथ्वीराज गायकवाड याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे पोलिस संघाने इऑन वॉरीयर्स संघाचा ४ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना इऑन वॉरीयर्सने अक्षय पंचारीया (७० धावा), कश्यप बाकळे (४५ धावा) आणि अभिमन्यु चौहान (४२ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १६६ धावांचे आव्हान उभे केले. पृथ्वीराज गायकवाड याने ३२ धावात ३ गडी बाद केले. पुणे पोलिस संघाने हे आव्हान १८.३ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. राहूल देसाई याने ५६ धावांची खेळी केली. अवधूत दांडेकर (३८ धावा) आणि परिक्षीत (३३ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
इव्हॅनो इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १७२ धावा (शुभम हरकाल ६१ (४४, ९ चौकार, २ षटकार), निखील जोशी ५० (३२, ४ चौकार, १ षटकार), रोहीत खरात २४, प्रफुल्ल मानकर २-२३) वि.वि. अष्टपैलू स्पोर्ट्स फाउंडेशनः २० षटकात ८ गडी बाद १५७ धावा (प्रफुल्ल मानकर नाबाद ६५ (४८, १० चौकार, १ षटकार), अमन मुल्ला १४, ऋषीकेश जाधव २-२८); सामनावीरः शुभम हरकाल;

इऑन वॉरीयर्सः २० षटकात ७ गडी बाद १६६ धावा (अक्षय पंचारीया ७० (४७, ७ चौकार, ४ षटकार), कश्यप बाकळे ४५,
अभिमन्यु चौहान ४२, पृथ्वीराज गायकवाड ३-३२, अक्षय जांबेकर २-२८) पराभूत वि. पुणे पोलिसः १८.३ षटकात ६ गडी बाद १६७ धावा (राहूल देसाई ५६ (३०, ३ चौकार, ६ षटकार), अवधूत दांडेकर ३८, परिक्षीत ३३, नचिकेत वेरलेकर २-३८); सामनावीरः पृथ्वीराज गायकवाड;

Web Title :-  S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament! Second win for Pune Police in a row; Winning performance of Ivano XI team

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

Subhash Desai | मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले-‘त्याचं राजकीय अस्तित्व…’