Sabyasachi Mukherjee | अखेर सब्यसाची मुखर्जीने ‘ती’ जाहिरात घेतली माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Sabyasachi Mukherjee | मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या जाहीरातीमुळे प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) ट्रोल होताना दिसून आलं. या कारणामुळे त्या वादाच्या भोव-यात सापडल्या होत्या. मात्र, सब्यसाची मुखर्जी यांनी अखेर ती जाहिरात मागे घेतली आहे. या जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मुखर्जी यांनी माफी देखील मागितली आहे.

 

सब्यसाची (Sabyasachi Mukherjee) यांनी दिवाळी सणाच्या (Diwali Festival) पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या खास ज्वेलरी कलेक्शनमधील डिझायनर मंगळसूत्राच्या
(Designer Mangal Sutra) आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल समाजातून नाराजी होती. तसेच ट्रोल देखील केले जात होते.
तसेच, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी सब्यसाची यांना ही जाहिरात काढून टाकण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देऊन त्यांच्या अटकेसाठी पोलीस पाठवण्याचा इशारा दिला होता.

 

दरम्यान, या इशाऱ्यानंतर सब्यसाची यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन जारी केलं. आणि ही जाहिरात मागे घेत असल्याचे जाहीर केलं.
‘या मंगळसूत्र जाहिरात मोहिमेचा उद्देश वारसा आणि संस्कृतीला डायनॅमिक कॉनव्हर्सेशन बनवण्याच्या संदर्भात सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरण याविषयी बोलण्याचा होता.
या मोहिमेचा उद्देश एक सणाचा होता, मात्र त्यामुळे आपल्या समाजातील एक वर्ग दुखावला गेला आहे. याचे आम्हाला खूप दुःख आहे.
त्यामुळेच आम्ही ‘सब्यसाची’ने ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title : Sabyasachi Mukherjee | sabyasachi mukherjee take back new controversial advertise of mangalsutra collection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर

PAN Card | पॅन कार्ड गहाळ झालेय, ‘या’ सोप्या पद्धतीने कोणत्याही कागपत्राशिवाय काढा नवीन PAN Card

Shankarrao Gadakh | शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाईड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपने केली चौकशीची मागणी