Sachin Vaze Case : सचिन वाझे यांच्या NIA कोठडीत वाढ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या एनआयए (NIA) कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यानंतर मला आणखी एनआयए कोठडी देऊ नका, जी चौकशी करायची होती ती करून झाली आहे अशी माहिती वाझे यांनी युक्तीवादादरम्यान कोर्टात दिली. मला बळीचा बकरा बनवलं जात आहे. मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. मला कोर्टाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत असंही वाझे यांनी कोर्टात सांगितलं. दरम्यान वाझेंच्या युक्तीवादानंतर तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते लेखी लिहून द्या असे निर्देश कोर्टनं वाझे यांना दिले.

सचिन वाझे यांच्या विरोधात अँटिलिया स्फोटकं प्रकरणी गैरकायदा कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्राविरोधी कारवायांविरोधात ही कलमं लावली जातात. बुधवारी एनआयएनं या प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाला युएपीए (UAPA) कलम लावण्याविषयी माहिती देताना अर्ज दाखल केला होता. वाझे यांच्यावर यीएपीए च्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात आज एनआयए कोर्टात सुनावणी करण्यात आली.

‘मला बळीचा बकरा बनवलं जात आहे’ : सचिन वाझेंचा दावा
NIA कोर्टात सुनावणी सुरू असताना युक्तीवादादरम्यान सचिन वाझे यांनी मला बळीचा बकरा बनवलं जात आहे असा दावा केला. ते म्हणाले, मी केवळ या प्रकरणाचा तपास करतो होतो. मी दिड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितलं की, तुझ्याविरोधात पुरावे आहेत. आम्ही तुला अटक करतोय. जी चौकशी करायची होती, ती करून झालीय. आता आणखी एनआयए कोठडी देऊ नका अशी विनंती देखील वाझे यांनी यावेळी कोर्टात केली. मला कोर्टाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत असंही वाझे यांनी कोर्टात सांगितलं.

‘बचावपक्षाचा युक्तिवाद हास्यास्पद’ : एनआयए
सचिन वाझेंच्या युक्तीवादावर बोलताना बचावपक्षाचा हा युक्तिवाद हास्यास्पद आहे असं प्रतिपादन एनआयएनं केलं. जर धमकावण्याचा हेतू नव्हता तर मग गाडी काय समारंभासाठी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहरे लावली होती का ? असा सवाल एनआयए नं केला. एनआयएच्या वतीनं युक्तीवाद करताना एएसजी अनिल सिंह यांनी स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेलं धमकीचं पत्रच कोर्टात वाचून दाखवलं. अगली बार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा. तुझे और तेरी पूरी फॅमिली को उडाने का बंदोबस्त कर दिया है असा उल्लेख त्यात होता. दरम्यान धमकीची दोन पत्रे स्कॉर्पिओ कारमध्ये असल्याचं एनआयएनं सांगितलं. दुसऱ्या पत्रात अश्लिल भाषेचा वापर असल्यानं सरकारी वकिलांनी ते वाचून न दाखवता थेट न्यायमुर्तींना सोपवलं. दरम्यान विशेष न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यापुढं ही सुनावणी सुरू आहे. सचिन वाझे यांच्यासाठी एनआयएनं आणखी 15 दिवसांची कोठडी मागितली आहे.

‘वाझें गुन्हा देश पातळीवर मोठा गुन्हा, पोलिसाचा अशा गुन्ह्यात सहभाग असणं शरमेची बाब’
एनआयएच्या वतीनं युक्तीवाद करताना एएसजी अनिल सिंह म्हणाले, वाझे यांचा गुन्हा हा देश पातळीवर मोठा गुन्हा आहे. एखाद्या पोलिसाचा अशा गुन्ह्यात सहभाग असणं ही शरमेची बाब आहे. वाझे यांच्या जवळ 62 बेहिशोबी जिवंत काडतुसं आढळली. त्यांना सरकारनं दिलेली सगळी काडतुसं ही गायब असल्याचंही सांगितलं आहे.