भाजपकडून सचिन वाझेंच्या नार्को टेस्टची मागणी, शरद पवारांनी देखील दिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक केेली आहे. एवढेच नाही तर वाझेंच्या अटकेनंतर आता ठाण्यातून अन्य काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक व एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे बोलले जाते. दरम्यान, या घडामोडींनंतर भाजप आक्रमक झाला असून थेट सचिन वाझे यांच्या नोर्को टेस्टची मागणी केली आहे. भाजप नेते राम कदम म्हणाले की, जर काही केल नसेल तर नार्को टेस्टची भीति बाळगण्याची गरज नाही. ही टेस्ट झाली तर दूध का दूध पानी का पानी होईल. तसे झाले नाही तर लोकांसमोर ठाकरे सरकारचा नवा चेहरा समोर येईल असेही कदम म्हणाले.

दरम्यान, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येईल त्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर बोलण्यास टाळलं आहे. स्थानिक विषयावर मी जास्त भाष्य करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

१३ तासाच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना शनिवारी रात्री एनआयएकडून अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कार्पिओ लावली होती ती वाझे यांनीच लावल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी सचिन वाझेंनी अंतरिम जामीनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने प्रथमदर्शी अर्जदाराविरोधात पुरावे दिसत असल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचं म्हणत हा जामीनाचा अर्ज फेटाळला.

सचिन वाझेंचं व्हॉट्स ॲप स्टेटस
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात हिरेन कुटुंबियांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर विरोधकांनीही वाझेंवर आरोप केल्यानंतर गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांची क्राइम ब्रँचमधून विशेष शाखेत बदली केल्याचे जाहिर केले. त्यानंतर सचिन वाझे यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपव एक स्टेटस ठेवल. ते सर्वांच लक्ष वेधून घेत होतं. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस त्यांनी ठेवल होत. यामुळे सर्वत्र वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली होती.

अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर
सचिन वाझे यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक महिती समोर आली आहे. अंबानी यांच्या निवासस्थनाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओचा वापर चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (४ नोव्हेंबर) करण्यात आल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी हि कार अंबानींच्या घरासमोर आढळली तत्पूर्वी ती वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.