‘सेक्रेड गेम’चा खरा ‘व्हिलन’ कोण ? गुरुजी, गायतोंडे की अनुराग कश्यप ?

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – १५ ऑगस्टच्या दिवशी प्रत्येक भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत असतो आणि स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज होत असतो मात्र या वेळेस १५ ऑगस्टसाठी तरुणाई आणखी एका गोष्टीच्या तयारीत होती आणि ती गोष्ट म्हणजे सेक्रेड गेम २ चा सिझन पाहण्याची तयारी.

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सेक्रेड २ चे सर्व भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तरुणाई या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होती कारण पहिल्या सिझनमध्ये पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या दुसऱ्या सीझनमध्ये मिळणार होती.

हे जग वाचवण्याच्या लायकीचे आहे का ?
या प्रश्नामुळे अनेकांना सिरीज पाहण्याबाबत आपले बलिदान द्यावे लागले. मात्र खरंच विचार केला तर नेमका एक प्रश्न पडतो की, या सिरींजचा शत्रू (व्हिलन ) कोण आहे ? गणेश गायतोंडे की गुरुजी का हा सिझन दिग्दर्शित करणारे अनुराग कश्यप ?

1. सिझन २ मध्ये दाखवलेले व्हिलन – गुरुजी
पहिल्या सीझनच्या शेवटी गुरुजी नावाचे कॅरेक्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पंकज त्रिपाठी यांचा सक्षम अभिनय या पात्रात खूप काही सांगून जातो. त्यामुळे दुसरा सिझन पाहिल्यावर आपल्याला समजते की खरा व्हिलन हा गुरुजी आहे जो की सगळ्यांना आपल्या बोटांवर नाचवत आहे.

आपल्या चेहऱ्यावर शांत भाव आणि वाणीमध्ये अती शिलता असलेले गुरुजी मुंबईला उद्धवस्थ करण्याचा प्लॅन करतात. त्याबरोबरच संपूर्ण जगामध्ये नुक्लिअर हल्ला करून सगळे जग नष्ट करायचे आणि कलियुग संपवायचे कारण कलियुग संपवल्यानंतरच सतीयुगाचा प्रारंभ होणार आहे असे गुरुजींचे मत असते पंकज त्रिपाठी यांचा हा सर्वात जबरदस्त अभिनय आहे.

२. व्हिलन – गणेश  गायतोंडे
गणेश गायतोंडेला अजूनही चाहते फैझल खानंच समजतात त्यामुळे गणेश गायतोंडे लगेच प्रेक्षकांना आवडतो आणि तोच सर्वशक्तिशाली, सर्वशक्तीमान, भगवान असल्याचे वाटू लागते.

मात्र दुसऱ्या सिझनमध्ये हळू हळू समजून येते की, गणेश गायतोंडे पेक्षा गुरुजी मोठे व्हिलन आहेत आणि सुरु होतो अभिनयाचा संघर्ष अनेकदा गुरुजी हे कॅरेक्टर गायतोंडेंवर अनेकदा वरचढ ठरते त्यामुळे गायतोंडे प्रेक्षक काहीसे विचार करू लागतात.

३. या सीझनचा खरा व्हिलन ‘अनुराग कश्यप’
अनुराग कश्यप हे असे दिग्दर्शक आहेत जे अशा कथांवर भर देतात ज्या कथा लोकांच्या थेट डोक्यात खेळून राहतात याचा प्रत्येय गँग्स ऑफ वास्सेपुरमध्ये प्रेक्षकांना आला होता. त्यामुळे अनुराग कश्यप यांनी हटके आणि वेगळ्या स्टाईलने बनवलेल्या सेक्रेड गेमला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

मात्र दुसऱ्या सीझनचा सगळा खेळचं बदलून टाकला सिझन २ च्या पहिल्या  कथा विस्कटायला सुरुवात होते तर शेवटच्या भागापर्यंत कथा विस्कटतंच जाते. पहिल्या भागात दोन कहाण्या सोबत जात होत्या एक भूतकाळातील गायतोंडेंची आणि दुसरी वर्तमानातील सरताज सिंहची मात्र दुसऱ्या भागात काही एपिसोड नंतर गायतोंडेंचा पूर्ण भाग संपतो आणि सुरु होतो सरताजचा वर्तमानकाळ.

सिझन १ च्या शेवटी जे जे प्रश्न पडलेले आहेत त्या सगळ्यांची उत्तर दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना मिळतात. सीझनचा काही भाग स्लो आहे असा समजून एपिसोड नीट न पाहणाऱ्याला सर्व काही डोक्यावरून गेल्याची भावनाही येते. दुसऱ्या सीझनचा शेवट काहींना समजत नाही त्यामुळे हा शेवटी की पुन्हा एकदा पुढच्या अंकाची तयारी असा विचार करणाऱ्यांनी समजून जावे की हा शेवट अनुराग कश्यप स्टाईल आहे.

शहर वाचणार का ?
सीझनच्या शेवटी गायतोंडे मीच कली आहे मीच परम आहे आणि मीच ब्रम्हा आहे असाच जोर जोरात म्हणत असतो. त्यामुळे शेवट समजून घेण्यासाठी नीट सेक्रेड गेम पाहावा लागेल.

आरोग्यविषयक वृत्त –