SAD NEWS : सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नांदगाव (ता. कराड, जि. सातारा) येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मारुती पाटील यांचे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. आबा नावाने ते कराड तालुक्यात परिचित होते. त्यांचा सामाजिक आणि विधायक कार्यात मोठा सहभाग होता.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, स्नूषा, पत्नी, दोन भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. युवा पत्रकार संदीप पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.