बॅरिकेट्स तोडून टँकरची धडक ; 2 जवानांचा मृत्यू, दोघे जखमी

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश राज्यातील बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टँकर आणि ट्रक यांच्या दोघात अपघात झाला. आणि टँकर धडकून, बॅरिकेट्स तोडून कर्तव्यावर असलेल्या जवानांच्या अंगावर गेला. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग-NH91 वर झाला आहे. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण जखमी झाले. याबात त्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार, शेतकरी आंदोलनामुळे या सैनिकांची ड्युटी महामार्गावर लावण्यात आली होती, तेथे त्यांनी तात्पुरते तंबू बसवले होते. पहाटे चारच्या दरम्यान हा अपघात झाला असून दोन्ही मृत सैनिक हे गाझियाबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी डझनभर सैनिक तैनात करण्यात आले होते.

बुलंदशहरच्या सिकंदराबाद भागात ट्रॅक आणि टँकर यांची एकमेकांना जोरदार टक्कर लागून भीषण अपघात झाला. त्यानंतर टँकर चालकाचा ताबा सुटला आणि कॅम्पमध्ये घुसला, त्यात दोन पीएसी जवानांचा मृत्यू झाला. अशी माहिती तेथील पोलिस अधीक्षक यांनी दिली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.