Sahakar Nagar Pune Crime News | सहकारनगरमध्ये दरड कोसळली ! मुले खेळत नव्हती म्हणून अनर्थ टळला, 4 दुचाकींचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sahakar Nagar Pune Crime News | मागील आठवड्यात पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Pune Rains) टेकड्यांवरून माती वाहून आली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. सहकारनगर क्रमांक दोन येथे क्षितिज सोसायटीच्या आवारात दरड कोसळून त्याखाली चार मोटारसायकल अडकल्याची माहिती मिळत आहे.(Sahakar Nagar Pune Crime News)

गुरुवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धनकवडी भागातील चव्हाणनगर येथेही दरड
कोसळण्याबाबतच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशासनात पत्र दिले असताना सहकारनगर भागात ही घटना घडली.

याठिकाणी लहान मुले खेळत असतात. जर गाडीच्या ठिकाणी मुले असती तर वाईट दुर्घटना घडली असती.
त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवासीयांकडून केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच शरद पवार गटाचे नितीन कदम, माजी नगरसेवक महेश वाबळे,
महापालिकेचे अधिकारी महेश बनकर, उमेश शिदूक, वनविभागाचे प्रदीप संकपाळ यांनी घटनास्थळी भेट दिली,
याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक महेश वाबळे , नितीन कदम यांनी केलेली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)