Sahakar Nagar Pune Crime | पुणे : घरात घुसून पतीला जीवे मारण्याची धमकी, महिलेला अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sahakar Nagar Pune Crime | दारुच्या नशेत घरात शिरुन पतीला जीवे मारून टाकण्याची धमकी (Death Threat ) दिली. तसेच अश्लील शिवीगाळ करत झटापट करुन असभ्य वर्तन (Rude behavior) करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी एका व्यक्तीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 24 एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारस धनकवडी येथे घडला आहे.

याबाबत 30 वर्षीय महिलेने रविवारी (दि.28) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विकास सुनिल मोरे Vikas Sunil More (रा. खोपडे नगर, कात्रज – Katraj Khopde Nagar) याच्यावर आयपीसी 354(अ), 452, 504, 506, 294 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दारुच्या नशेत फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने घरात घुसून मोठमोठ्याने आरडाओरडा करुन तुझा पती कुठे आहे अशी विचारणा केली.(Sahakar Nagar Pune Crime)

याबाबत फिर्यादी यांनी पतीला फोन केला असता आरोपीने मोबाईल हिसकावून घेतला.
फिर्यादी यांच्यासोबत झटापट करुन अश्लील शिवीगाळ केली. तसेच पतीचा मर्डर करतो असे बोलून धमकी दिली.
आरोपीने गल्लीत उभा राहुन फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न निर्माण होईल असे असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत
नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अश्लील बोलून महिलेचा विनयभंग

येरवडा : आई आणि मुलीला अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग केल्या प्रकरणी एकावर येरवडा पोलीस ठाण्यात
(Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) रात्री दहाच्या सुमारास
येरवडा परिसरात घडला आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून रवीसिंग जंगीसिंग बावरी
Ravisingh Jangisingh Bawri (वय-29 रा. मांगीरबाब चौक, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Varunraj Bhide Journalism Award | सध्या व्यवस्थेविरुद्ध लिहिणाऱ्या पत्रकाराला देशद्रोही म्हटले जातेय, हे लोकशाहीला लांच्छनास्पद : अनंत बागाईतकर

Ajit Pawar Vs Sharad Pawar | शरद पवार एका बाजूला आणि संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला, अशीही झाली होती एक निवडणूक, अजित पवारांनी सांगितला जुना किस्सा