Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरच्या कार चालकास मालवणमध्ये बेदम मारहाण

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिच्या गाडी चालकाला काही तरुणांनी मारहाण केली आहे. मागील 6 वर्षांपासून सईकडे ड्राइव्हर म्हणून काम करत असणाऱ्या 32 वर्षीय इसमास मालवण परिसरामध्ये गंभीर मारहाण (Sai Tamhankar Driver Seriously Beaten) करण्यात आली आहे. याबाबत त्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली आहे. दोनदा हॉर्न वाजवल्याच्या शुल्लक कारणावरून सईच्या (Sai Tamhankar) ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या चित्रपटांमुळे (Sai Tamhankar Movie) व वैयक्तिक आय़ुष्यामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी तिच्या ड्रायव्हरला झालेल्या मारहाणीमुळे चर्चेचा विषय बनली आहे. मालवण (Malvan) परिसरामध्ये काही तरुण हे झिगझॅक पद्धतीने टू व्हिलर चालवत होते. यामुळे सईच्या ड्रायव्हरने त्यांना दोन वेळा हॉर्न दिला. विचित्र पद्धतीने गाडी चालवणाऱ्या तरुणाचा या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी ड्रायव्हरला बेल्ट व बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. सई ताम्हणकरच्या (Sai Tamhankar) या ड्रायव्हरचे नाव सद्दाम मंडल (Saddam Mandal) असे असून त्याने घडलेल्या सर्व प्रकारानंतर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांविरोधात एफआयआर दाखल केली असून पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जखमी झालेल्या ड्रायव्हरला उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Entrepreneurs Association (MEA) | उद्योगासाठी मराठा तरुणांना महामंडळाचे अर्थसहाय्य; नरेंद्र पाटील यांचे मत

Fidel Technologies Sunil Kulkarni | तंत्रज्ञान, कौशल्य अवगत करत स्वतःला ‘अपग्रेड’ ठेवावे; सुनील कुलकर्णी यांचा सल्ला