Saiee Manjrekar | अभिनेत्री सई मांजरेकरने केले आहे तब्बल तीन भाषेतील मनोरंजन सृष्टीमध्ये काम

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar) ही तिच्या अदांसाठी व अभिनयासाठी नावाजली जाते. सईचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या सौंदर्यावर लाखो फिदा आहे. अभिनेत्री सई मांजरेकर ही मागील काही वर्षापासून लाईमलाईटमध्ये आली असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता असते. अभिनेत्री सई मांजरेकर ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेकदा ती तिचे नवनवीन फोटोशूट (Saiee Manjrekar) व लाईफ अपडेट शेअर करत असते. सईचे इंस्टाग्रामवर 1.5 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ‘दबंग गर्ल’ अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar) हिने एक दोन नाही तर तीन भाषांमधील चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. आज सई तिचा 24 वा वाढदिवस (Saiee Manjrekar) साजरा करत आहे.

अभिनेत्री सई मांजरेकर हिचा जन्म 29 ऑगस्ट 1998 रोजी मुंबईमध्ये (Mumbai) झाला आहे. लहानपणापासूनच तिला तिच्या घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले. सई ही अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) व दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची मुलगी आहे. अगदी लहान वयामध्ये असल्यापासून तिला अभिनयाची आवड होती. तिने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केले. तिने पहिल्यांदा ‘काकस्पर्श’ या चित्रपटामधून (Kakasparsh Movie) बालकलाकार म्हणून पदार्पण केले. अभिनेत्री सई मांजरेकर हिचा ‘काकस्पर्श’ हा पहिला मराठी चित्रपट (Marathi Movies) होता. मोठी झाल्यावर मात्र सर्वत्र सईच्या सौंदर्याच्या चर्चा रंगू लागल्या. आणि तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले.

अभिनेत्री सई मांजरेकर हिने ‘दबंग 3’ या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये जबरदस्त पदार्पण (Saiee Manjrekar Bollywood Debut) केले. तिने यामध्ये सलमान खानसोबत (Salman Khan) स्क्रीन शेअर केली. सलमान व सईची जोडी चाहत्यांना खूप आवडली. ‘दबंग 3’ (Dabangg 3) या चित्रपटामुळे सई मांजरेकर हिला ‘दबंग गर्ल’ म्हणून ओळख मिळाली. तिची चित्रपटातील भूमिका आणि तिच्या अदा पाहून प्रेक्षक देखील घायाळ झाले होते. सईचा हा हिंदी चित्रपट होता. ‘दबंग 3’ चित्रपटामुळे अभिनेत्री सई मांजरेकर हिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. या चित्रपटासाठी सईला फिल्मफेअर बेस्ट फीमेल डेब्यू अवॉर्डसाठी (Filmfare Award) नामांकित झाली होती.

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे सई मांजरेकर हिने तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
तिने ‘घनी’ या तेलुगू चित्रपटामध्ये (Ghani Telugu Movie) भूमिका साकारली आहे.
यामध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तसेच तिने ‘मेजर’ या चित्रपटामध्ये (Major Movie) देखील काम
केले होते. ‘मेजर’ हा चित्रपट तेलुगू व हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
अशा प्रकारे अभिनेत्री सई मांजरेकर हिने मराठी, हिंदी, तेलुगू अशा तीन भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सईचे अजूनही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
लवकरच तिचा ‘कुछ खट्टा हो जाए’ (Kuch Khattaa Ho Jaay) आणि ‘औरों में कहां दम था’ (Auro Me Kahan Dum Tha)
हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री सई मांजरेकर हिने अल्पावधीतच मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन ऑफ द इयर 2019 (Times Most Desirable Woman) मध्ये देखील
अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar) ही 47 व्या स्थानावर होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत

NCP | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाकडून नियुक्ती