पटौदी पॅलेसमध्ये झाले ‘तांडव’चे शूटिंग, यामुळे तयार झाला होता सैफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सैफ अली खान आजकाल आपल्या आगामी वेब सिरीज तांडव बद्दल चर्चेत आहे. या सिरींजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यासह सैफचा आलिशान बंगला पटौदी पॅलेसही चर्चेत आहे. त्यामागील कारण म्हणजे पटौदी पॅलेसमध्ये तांडव सीरिजचे शूटिंग. ट्रेलरमधील सिरींजची ओपनिंग पटौदी पॅलेसमधूनच होते. ट्रेलरमध्ये त्यात दिसत असलेला पांढरा बंगला जेथून सैफ लोकांना अभिवादन करतो तो म्हणजे पटौदी पॅलेस. या सिरीजमध्ये पटौदी पॅलेसचा भव्य परिसर पाहायला मिळत आहे.

माहितीनुसार, सैफ अली खानने पटौदी पॅलेसमध्ये शूटिंगबद्दल सांगितले की, हा तो महाल आहे जो रॉयल लूक देतो. तिथे उभा असलेला कोणताही व्यक्ती रॉयल दिसेल.” सैफ पुढे म्हणाला- “पॅलेसला मला शूटिंगसाठी देण्यास हरकत नाही कारण वर्षातील 340 दिवस तो वापरला जात नाही.” आजकाल फिल्म क्रू अधिक जबाबदार बनले आहेत आणि आपल्या व्हेन्यूची देखरेखही करतात. पण तिथे शूटिंग करण्याच्या कल्पनेने मला अजूनही भीती वाटते.

‘राजवाड्या एक्सटिरियर शूटिंगसाठी मला काहीच हरकत नाही. पण तांडव साठी पॅलेसच्या आत शूट करणे माझ्यासाठी अपवाद होते. आपल्या सीरिजविषयी बोलताना सैफ म्हणाला- मला हुशार लोकांकडून आलेल्या रिव्ह्यूमध्ये रस आहे. मी चाहत्यांचा आदर करतो, त्यांना प्रतिसाद देतो, पण सोशल मीडियावर म्हंटले जाते की, मी आता प्रतिक्रिया ऐकत नाही’. जेव्हा मी माझे कोणतेही काम पाहतो तेव्हा मला माहित असते मी कॉन्फीडंन्ट आहे की नाही. होय, मी निश्चितपणे म्हणू शकतो की मी तांडवासाठी कॉन्फीडंन्ट आहे. ‘

या मालिकेत सैफ अली खान, डिंपल कपाडिया, जिशान अयूब, सुनील ग्रोव्हर, कृतिका कामरा, गौहर खान, कुमुद मिश्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकारणावर आधारित या सिरीजमध्ये पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी तांडव पाहायला मिळणार आहे. तांडव वेब सिरीज 15 जानेवारी रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होईल. या सिरीजमध्ये एकापेक्षा एक कलाकार आहेत ज्यांच्या कामगिरीची झलक ट्रेलरमध्ये आधीच दाखविली गेली आहे. सैफच्या तांडवबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.