भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवरील जाहिरातींमुळे ‘भडकली’ सानिया मिर्झा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान मधील एका वृत्तवाहिनीने हि जाहिरात तयार करण्यात आली असून अभिनंदन सारख्या मिश्या आणि त्याच्यासारखीच बोलण्याची शैली या मॉडेलने पकडली असल्याचे या जाहिरातीत दिसून आले होते.

संपूर्ण देशभरातून या जाहिरातीवर टीका करण्यात आल्यानंतर आता भारताची टेनिसस्टार आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याची पत्नी सानिया मिर्झा हीने देखील यावर टीका केली आहे. दोन्ही देशांच्या चॅनलवर या सामन्यानिमित्त वादग्रस्त जाहिराती दाखवण्यात येत आहे. त्यावरून तिने ट्विट करत आपले मत मांडले आहे.

या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे कि, दोन्ही देशांकडून अशा वादग्रस्त जाहिरातींची अपेक्षा नाही. कधीतरी गंभीर बना. या अशा प्रकारच्या जाहिरात तयार करून वातावरवण निर्मिती करण्याची काहीही गरज नाही, अगोदरच यावर खूप जणांचे लक्ष आहे. अशा प्रकारच्या जाहिरातींची यासाठी गरज नाही, हा फक्त एक खेळ आहे.

काय म्हटले आहे या जाहिरातींमध्ये

पाकिस्तानच्या चॅनलने तयार केलेल्या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे कि, या जाहिरातीतील मॉडेल या सामन्याविषयी बोलताना दिसून येत आहे. यात अभिनंदन ज्या पद्धतीने पाकिस्तानी सैनिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता, त्याच स्टाईलमध्ये हा मॉडेल देखील बोलताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये त्याला रविवारी होणाऱ्या सामन्याविषयी प्रश्न विचारण्यात येत आहेत.

या जाहिरातीत त्याला भारत – पाकिस्तान सामना आणि सामन्याच्या रणनीतीबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. त्यावर हा मॉडेलही चहाचा घोट घेत विंग कमांडर अभिनंदनसारखी उत्तरं देतो. विंग कमांडर अभिनंदनने न घाबरता प्रश्नांची उत्तरं दिली होती. पण या जाहिरातीत मात्र हा मॉडेल घाबरल्याचा अभिनय करतो.

त्याच वेळी भारतीय चॅनलवरील जाहिरातीतील तरुण स्वतःला पाकिस्तानचा वडील म्हणत आहे, या जाहिरातीवर देखील देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे या सामन्यासाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर जोश दिसून येत आहे. मात्र या अशा प्रकारच्या जाहिरातीने दोन्ही देशातील आवड कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहेत.

https://twitter.com/MirzaSania/status/1138694896351498240

सिने जगत –

‘या’ अभिनेत्याचा ‘फेक’ फोटो सोशलवर शेअर केल्याने 2 महिलांसह 5 जणांविरूध्द तक्रार दाखल

दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल

‘या’ आहेत बॉलिवूडच्या टॉप ‘५’अ‍ॅक्ट्रेस ज्यांना तुम्ही ओळखू शकणार नाहीत

अखेर अमिताभ बच्चन यांचे ‘ते’ वचनही झाले पूर्ण !

 

Loading...
You might also like