Salil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पूत्र सलिल देशमुखांना देखील ED समन्स बजावण्याची शक्यता

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या शंभर कोटी वसुलीच्या आरोपावरून चौकशीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे द्वितीय पुत्र सलील देशमुख (Salil Deshmukh) यांना देखील सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) लवकरच समन्स वाजवण्याची शक्यता आहे. सलील देशमुख (Salil Deshmukh) यांच्या कंपनीने उरण तालुक्यात (Uran Taluka) खरेदी केलेल्या करोडो रुपयांच्या जमिनीचा तपास करण्यास सक्तवसुली संचलनालयाने (ED) सुरुवात केली आहे. याप्रकरणी हे समन्स बजवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

येथील उरण तालुक्यामधील धुटूम (Dhutum) गावात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांची गुंतवणुक (Investment) असलेल्या प्रीमियर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (Premier Port Pvt. Ltd.) या कंपनीने 15 जमिनी खरेदी (Purchase of 15 lands) केल्या आहेत.
ज्यांची किंमत जवळपास 300 कोटी (300 crores) रुपयांच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे.
तर ही जमीन पळस्पे फाटा ते जेएनपिटी (JNPT) या परिसरात 8.3 एकर इतकी जमीन आहे.

या दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाला (ED) ही कंपनी सलील देशमुख चालवत असल्याची माहिती मिळाली आहे.
या माहितीवरून आता लवकरच सलील देशमुख यांची देखील चौकशी (Inquiry) होण्याची शक्यता असल्याचं सूत्राकडून सांगण्यात आलं आहे.

Web Title : Salil Deshmukh | enforcement directorate may summon salil deshmukh son of anil deshmukh

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

RDG Account | RBI देतंय भरघोस परतावा (रिटर्न) कमावण्याची संधी ! RDG स्कीममध्ये उघडा खाते, पैसेही राहतील सुरक्षित

Pune Corporation | 15 जुलैची सर्वसाधारण सभा बेकायदेशीर ! 23 गावांच्या नव्या डीपीचा हट्ट कशाला?: राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप

Pune Crime | पुण्यात लग्नाच्या दिवशीच नवरी मुलीसह चौघांविरूध्द गुन्हा; स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून केलं होते फोटो, व्हिडीओ शुटिंग (Video)