सलमान खानच्या Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  यशराज स्टुडिओमध्ये फिल्म ‘टायगर 3’ ची शुटिंग सुरु करण्यात आली आहे. या फिल्ममध्ये अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ या दोघांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हे दोघेही चित्रपटात हेर म्हणून दिसणार आहेत. तर अभिनेता इम्रान हाश्मी ही यामध्ये असणार आहे. इम्रान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत असेल.

सलमान खान आणि कॅटरिना कैफ या दोघांच्या मोठ्या ब्रेकनंतर इम्रान हाश्मीने फिल्मचे शुटिंग केले. या फिल्मची शुटिंग मोठ्या सुरक्षेत झाली. आता या फिल्ममध्ये इम्रान हाश्मी खलनायकाच्या (विलन) भूमिकेत दिसणार आहे. पिंकवालाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान हाश्मी पाकिस्तानी एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. जे सलमान खानने सुरु केलेल्या रॉ अधिकारी, टायगरच्या विरोधात असेल. हे निश्चितच टायगर विरुद्ध टायगर असणार आहे. इम्रान हाश्मीचा कॅरेक्टर चांगलाच स्मार्ट आहे. त्याचा लूक आत्तापर्यंतच्या निगेटिव्ह रोल्सपेक्षाही चांगला आणि स्टायलिश दिसणार आहे.

‘टायगर 3’ या फिल्मची शुटिंगसाठी निर्माता आदित्य चोप्रा याने वेस्टर्न देशातील काही भाग बुक केला आहे. युरोपीय देशांत शेड्यूल फॉलो केले जाणार आहे. ज्यातील एका ठिकाणी यापूर्वी ‘एक था टायगर’ फिल्मची शुटिंग झाली आहे. ही फिल्म मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केली आहे.