Video : कॅटरीना कैफच्या बहिणीचा फॅन झाला ‘भाईजान’ सलमान ! गाणं पाहून म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार कॅटरीना कैफ (Katrina Kaif) हिची बहीण इसाबेल कैफ (Isabelle Kaif) हिनंही इंडस्ट्रीत पाऊल टाकलं होतं. एका पंजाबी म्युझिक व्हिडिओतून तिनं डेब्यू केला आहे. माशाल्लाह (Mashallah) असं या गाण्याचं नाव आहे. आता हे गाणं लाँच झालं आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. इसाबेल कॅटरीनाची कार्बन कॉपी आहे.

इसाबेलच्या या व्हिडिओला लोकांचं खूप प्रेम मिळताना दिसत आहे. यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूड स्टार सलमान खानलाही इसाबेलचा म्युझिक व्हिडिओ आवडला आहे. त्यानं व्हिडिओ शेअर करत इसाबेलला शुभेच्छा दिल्या आहेत.

बुधवारी (दि. 2 डिसेंबर) सलमान खाननं एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यानं लिहिलं की, अरे वाह, इसाबेल हे गाणं खूप सुंदर आहे. तू खूप छान वाटत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा.

इसाबेलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती क्वाॅथा (Kwatha) सिनेमात काम करताना दिसणार आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.

You might also like