Homeताज्या बातम्याSalman Khan | गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांच्या...

Salman Khan | गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला, केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) यांची भेट घेतली. गेल्या महिन्यात अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र (Threat Letter) आलं होतं. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील (Singer Sidhu Moose Wala murder case) आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) साथीदार गुंड विक्रम बराड (Vikram Barad) यानेच हे धमकीचं पत्र सलमानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांच्यापर्यंत पोहचवलं होतं, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

 

त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान (Salman Khan) याने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. यावेळी त्याने धमकीच्या पत्राचा उल्लेख केला. धमकीच्या पत्रानंतर त्याने बंदुकीचा परवाना (Gun License) मिळण्याबाबत पोलिसांकडे अर्ज केला आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी त्याने बंदूक बागळण्यासाठी परवानगी मागितली आहे. यावेळी साधारण 15 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली.

 

सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली आहे. काळवीट शिकार प्रकरणात (Antelope Hunting Case) सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. सलमानचा न्याय हा न्यायालयाच्या न्यायानुसार होणार नाही, त्याने आणि त्याच्या वडिलांनी जनतेसमोर येऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी त्याने केली होती. तसे न झाल्यास सलमान खानला ठार मारु असंही त्याने म्हटलं आहे.

 

काय आहे काळवीट प्रकरण?

राजस्थानमधील बिश्नोई समाज काळवीट प्राण्याला देव मानतात. 1998 मध्ये ‘हम साथ-साथ है’ या
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा आरोप झाला होता.
या प्रकरणी सलमान खानला जेलची हवा देखील खावी लागली होती. मात्र, या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीने उडी घेतली आहे.

 

Web Title :- Salman Khan | bhaijaan salman khan meets mumbai police commissioner threats received from lawrence bishnoi gang after mooswalas murder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News