Salman Khan | सलमान खानला विचारण्यात आली त्य़ाची लव्ह जर्नी

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा सुपरस्टार अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने अनेक वर्षे चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सलमान खानवर प्रेम करणारा लाखो चाहता वर्ग आहे. असे असले तरी देखील तो त्याच्या आयुष्यामध्ये खरे प्रेम मिळवण्यात अयशस्वी झाला आहे. सलमान खानच्या लग्नाची (Salman Khan Wedding) चाहत्यांना खूप उत्सुकता आहे आणि त्याला खरे प्रेम आता तरी मिळावे असे त्याच्या चाहत्यांना वाटते. अभिनेता सलमान खान हा अजूनही बॅचलर असला तरी देखील त्याच्या लव्ह अफेअरच्या (Salman Khan Love Affair) चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रींना सलमानने डेट केले असले तरी त्याच्या कोणत्याही अफेअरचे रुपांतर नात्यामध्ये होऊ शकले नाही. एका मुलाखतीमध्ये मात्र सलमान खानला (Salman Khan) त्याच्या लव्ह जर्नी बद्दल थेट विचारण्यात आले. त्यावर सलमानने दिलेल्या उत्तराने चाहत्यांना व्यथित केले होते.

अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाच्या तर चर्चा बी टाऊन मध्ये नेहमीच असतात पण त्याचबरोबर सलमान हा लग्न कधी करणार याचे देखील सर्वांना कुतूहल आहे. सलमानचे नाव हे अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. मात्र या सगळ्य़ांमध्ये त्याचे अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सोबतचे अफेअर (Salman Khan And Aishwarya Rai Affair) सर्वांत जास्त गाजले होते. या जोडीचा मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्या ब्रेकअपने चाहत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. एका मुलाखतीमध्ये सलमान खानला थेट त्याची लव्ह लाईफ जर्नी (Salman Khan Love Life) कशी होती असा प्रश्न करण्यात आला होता. या अचानक विचारलेल्या प्रश्नाने त्याला देखील आश्चर्यचकित केले. या प्रश्नाचे उत्तर देताना त्याचे डोळे पाणावले होते. उत्तर देताना तो थोडा थांबला आणि हसला आणि नंतर परत माईक जवळ घेत सलमान म्हणाला की, “काही लोकांची जर्नी ही लांब असते तर काही लोकांची जर्नी ही लवकर संपते.” असे उत्तर सलमान खानने दिले होते.

ऐश्वर्या रॉय आणि सलमान खानच्या अफेअरने एक काळ गाजवला होता. त्याची आणि ऐश्वर्याची ऑनस्क्रीन जोडी आणि ऑफस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडत होती. सलमान आणि ऐश्वर्याने ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam), ‘धाय अक्षर प्रेम के’ (Dhai Akshar Prem Ke), ‘हम तुम्हारे हैं सनम’ (Hum Tumhare Hain Sanam) या सुपरहिट चित्रपटांमध्ये (Salman And Aishwarya Movie) एकत्र काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. खूप गाजलेल्या या कपलने मात्र अचानक एक दिवस वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सलमान खान (Salman Khan) हा अभिनेत्रींना मारहाण करतो आणि अपशब्द वापरतो असा आरोप देखील त्यांच्यावर त्या काळी करण्यात आला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट’, चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र (व्हिडीओ)