Video : ‘भाईजान’ सलमाननं सुरू केली ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ ची शुटींग ! आयुष शर्मानं शेअर फर्स्ट लुक

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलवूड स्टार सलमान खान (Salman Khan) लवकरच आपला जीजू आयुष शर्माला (Aayush Sharma) घेऊन एक सिनेमा करणार होता. सलमान खान 2018 साली आलेल्या प्रविण तरडे (Pravin Tarde) डायरेक्टेड मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern) या मराठी सिनेमाचा रिमेक करणार आहे. खास बात अशी की, सलमान खान यात प्रमुख भूमिकेत आहे. अंतिम : द फायनल ट्रूथ (Antim : The Final Truth) असं या सिनेमाचं नाव आहे. सलमाननं गुपचूप सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली आहे. परंतु आयुषनं ही गोष्ट रिव्हील केली आहे.

आयुषनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर करत सिनेमातील सलमान खानचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. यात सलमान खान सरदार बनलेला दिसत आहे. आयुषनं सलमान खानचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, अंतिम सुरू झाला आहे.

सलमान खान या सिनेमात सरदार पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. स्टोरी आयुष शर्माच्या भोवती फिरणार आहे. आयुष शर्मा एका गँगस्टरचा रोल साकारणार आहे ज्याला सलमान खान पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. महेश मांजरेकर या सिनेमाचं डायरेक्शन करणार असल्याचं बोललं जात आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.