थिएटर मालकांच्या विनंतीनंतर ‘भाईजान’ सलमान सिनेमागृहातच रिलीज करणार ‘राधे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा सिनेमा राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) ची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पहात आहेत. सलमानचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. खुद्द सलमान खननंच याची पुष्टी केली आहे. देशभरातील थिएटर एग्जिबिटर्स असोसिएशननं सलमानला राधे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती मान्य करत समलान खाननं सांगितलं की, 2021 च्या ईद निमित्त हा सिनेमा रिलीज केला जाईल.

सलमान खान आणि त्याचा सिनेमा प्रोड्युस करणारी कंपनी झी नं ही विनंती लक्षात घेत आत राधे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमाननं ट्विटरवर लिहिलं की, माफ करा. सर्व थिएचर मालकांना उत्तर द्यायला वेळ लागला. सध्याच्या काळात हा एक मोठा निर्णय आहे. थिएटर मालक आणि एग्जिबिटर्स ज्या आर्थिक अडचणीतून गेले आहेत ती स्थिती मी समजू शकतो. मी राधे सिनेमा हॉलमध्ये रिलीज करत त्यांची मदत करू इच्छित आहे. परंतु त्यांनी सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची पू्र्ण काळजी घेतली जाईल अशी आशा मी व्यक्त करतो. कमिटमेंट ईदची होती. आणि आता हा सिनेमा 2021 च्या ईदलाच रिलीज होणार.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. आता 2021 च्या ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय सलमान अंतिम आणि शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.