Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूने घेतले अभिनेत्याकडून उपचारासाठी पैसे? सोशल मीडियावर दिले उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही नेहमी लाईमलाईटमध्ये असलेली अभिनेत्री आहे. समंथा हिचा मोठा चाहता वर्ग असून तिची सोशल मिडिया फॉलोईंग देखील जबरदस्त आहे. समंथा ही तिच्या चाहत्यांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. ती ‘मायोसिटिस’ (Myositis) या आजाराने ग्रस्त आहे हे देखील सर्वश्रूत आहे. समंथाने सध्या तिच्या याच आजारावरील (Samantha Health Issue) उपचारासाठी एक वर्षाचा मोठा ब्रेक घेतला आहे. मात्र तिच्या या उपचारासाठी तिने एका तेलुगू अभिनेत्याकडून 25 कोटी रुपये घेतले असल्याचे (Samantha Borrow Money From Actor) बोलले जात आहे. यावर आता अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने उत्तर दिले आहे.

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. तिने अनेक चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले असून आता ती कोणताही नवीन प्रोजेक्ट स्वीकरत देखील नाहीये. तिने निर्मात्यांकडून अडव्हान्स घेतलेले पैसे देखील परत केले आहेत. आता ती लवकरच अमेरिकेमध्ये जाऊन उपचार (Samantha US Treatment) घेणार आहे. मात्र उपचारासाठी तिने अभिनेत्याकडून पैसे घेतले असल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्याचे नाव न घेता अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने यावर स्पष्ट उत्तर दिले आहे.

समंथाने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणाली की, “मायोसाइटिस या आजाराच्या उपचारासाठी 25 कोटी? तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. मला या गोष्टीचं एक बरं वाटतं आहे की मला उपचारासाठी या रक्कमेतील खूप छोटी रक्कम लागणार आहे. इतकंच नाही तर, माझ्या करिअरमध्ये मी जे काही काम केले आहे त्या सगळ्या कामासाठी मला व्यवस्थीत मोबदला मिळाला आहे. त्यामुळे माझ्यासाठी लागणारा जितका खर्च आहे तो मी करू शकते. धन्यवाद.” अशा शब्दात तिने अभिनेत्याकडून उपाचारासाठी पैसे घेतल्या असल्याच्या अफवांवर सडेतोड उत्तर दिले आहे. त्य़ाच बरोबर तिने मायोसाइटिस आजाराबद्दल सांगितले असून ती म्हणाली आहे की, ‘मायोसाइटिस हा एक असा आजार आहे ज्याचे निदान हजारो लोकांना होते. त्याच्या विषयी काहीही बोलण्याआधी कृपया त्याविषयी थोडी माहिती आपण जाणून घ्यायला हवी.”

Samantha Ruth Prabhu

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने (Samantha Ruth Prabhu) अनेक हीट चित्रपट दिले आहेत. लवकरच तिचा अभिनेता वरुण धवनसोबत (Actor Varun Dhawan) ‘सिटाडेल’ हा चित्रपट (Citadel Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Actor Vijay Deverakonda) याच्यासोबत ‘खुशी’ चित्रपटात (Khushi Movie) स्क्रीन शेअर करणार आहे. या दोन्ही चित्रपटाचे तिने शुटिंग पूर्ण केले आहे. आता ती तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘ओळख लपवून मुलींशी लग्न अन् धर्मांतर…’, लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया (व्हिडीओ)