Devendra Fadnavis | ‘ओळख लपवून मुलींशी लग्न अन् धर्मांतर…’, लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | महाराष्ट्रात कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याची (Love Jihad Law) मागणी करत अहमदनगरमधील राहुरी शहर आणि तालुक्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा (Jan Akrosh Morcha) काढण्यात येत आहे. आज काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये (Sakal Hindu Samaj Protest) हजारो हिंदू नागरिक सहभागी झाले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. राज्यामध्ये हिंदू मुलींचं-तरुणींची फसवणूक अथवा बळजबरीने धर्मांतर (Conversion) केलं जात असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. या मोर्चाबद्दल आणि कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अलिकडच्या काळात राज्यात स्वत:ची ओळख लपवून काहींनी मुलींशी लग्न केल्याच्यानंतर त्या मुलींचे धर्मांतर झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अशा घटना समोर आल्या आहेत. त्यासंदर्भात सगळीकडून अशा प्रकराची (कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याची) मागणी होत आहे. याप्रकरणी एक कायदा केला पाहिजे, अशी मागणी केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मी स्तव: मागच्या काळात सभागृहात घोषित केलं होतं की याप्रकरणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे कायदे आहेत, त्यानुसार आम्ही अभ्यास करत आहोत. त्याप्रमाणे आम्ही आगामी काळात महाराष्ट्रात निर्णय घेऊ.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये (Assembly) देवेंद्र फडणवीस यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावर भाष्य केलं होतं.
फडणवीस म्हणाले होते, मुलींना फूस लावून पळवून नेणे, त्यानंतर त्यांच्याशी लग्न करणे, त्यांचे धर्मांतर करणे
आदी तक्रारींबाबत पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई करावी, यासाठी राज्याचे पोलीस महासंचालकांकडून (DGP) सर्व
पोलीस ठाण्यांना मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली जारी केली जाईल.
छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री येथील धर्मांतराच्या घटनेबाबत हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी
लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केले आहे गुपचूप लग्न; एका मुलाखतीमध्ये केले वक्तव्य