Sambhaji Raje Chhatrapati | संभाजीराजेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण, म्हणाले – ‘मला मुख्यमंत्री करा मग, प्रश्न चुटकीत संपवतो’

कोल्हापूर : सारथीच्या प्रश्नांसंदर्भात कोल्हापुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी घेतली. यावेळी आंदोलकांनी हा प्रश्न आपण सोडवावा, अशी मागणी संभाजीराजे यांच्याकडे केली असता, ते म्हणाले, मला मुख्यमंत्री (Chief Minister) करा, चुटकीत प्रश्न सोडवतो. दरम्यान, सध्या राज्यात आमदार अपात्रतेच्या प्रकरणामुळे (MLA Disqualification Case) मुख्यमंत्री बदलाची चर्चा सतत सुरू आहे. त्यातच संभाजीराजेंनी (Sambhaji Raje Chhatrapati) असे वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

फेलोशिप विद्यार्थी (Fellowship Student) तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर (Sarathi Akti Samiti Kolhapur) विभागाचे प्राध्यापक यांनी सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची संभाजीराजेंनी भेट घेतली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न सोडवतो, असे विधान संभाजीराजे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी यापूर्वी सुद्धा अशाप्रकारचे विधान केलेले आहे.
यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आंदोलन स्थळी गेल्यानंतर संभाजीराजे यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
मात्र, प्रश्न सुटल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘त्या’ नेत्यांचा सरकारवर दबाव, म्हणूनच मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले; मनोज जरांगेंचा मोठा आरोप